Delhi Car Blast pudhari photo
राष्ट्रीय

Delhi Car Blast: NIA ला मोठं यश! 'जिहाद'ची व्हॉईस नोट पाठवणारा 'तो' ९ वा आरोपी देखील अटकेत

यासिर हा दिल्ली कार बॉम्ब ब्लास्टमधील बॉम्बर डॉक्टर उमर नबी याच्या संपर्कात आला होता.

Anirudha Sankpal

Delhi Car Blast 9th Accused Arrest: राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ला दिल्ली कार ब्लास्टच्या तपासात एक मोठं यश आलं आहे. या प्रकरणातील नववा आरोपी यासिर अहमद दार याला अटक करण्यात आली आहे. याच आरोपीने दिल्ली कार ब्लास्टमधील सह आरोपी मुस्ती इरफान अहमदला जिहाद व्हॉईस नोट पाठवली होती.

या व्हॉईस नोटमध्ये यासिर हा जिहाद ऑपरेशनसाठी आपला जीव देखील कुर्बान करण्यास तयार असल्याचं जाहीर करताना दिसतोय. ही व्हॉईस नोट मुफ्ती इरफान फोनमधून रिकव्हर करण्यात आली होती.

टाईम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुफ्ती इरफान २०२३ मध्ये यासिरला भेटला होता. त्यानंतर त्यानं यासिरला दहशतवादी कारवायामध्ये सहभागी होण्यासाठी भरती करून घेतलं. जवळपास एप्रिल २०२४ यासिर हा दिल्ली कार बॉम्ब ब्लास्टमधील बॉम्बर डॉक्टर उमर नबी याच्या संपर्कात आला. यासाठी मुफ्ती इरफाननं मदत केली होती. डॉक्टर उमरने भारतीय शहरात आत्मघातकी हल्ले करण्यासाठी ब्रेनवॉश करू लागला होता.

सूत्रांनी सांगितल्यानुसार डॉक्टर उमर हे यासिरला कट्टरपंथीय मटेरियल पुरवत होता. तो याचे व्हिडिओ टेलिग्रामवरून पाठवत होता. तो यासिरला भारतात एक मोठा हल्ला करण्यासाठी प्रेरित करत होता.

आता एनआयएने यासिरवर युएपीए अॅक्ट आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये वेगवगळ्या कलमे लावली आहेत. एनआयएने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात सांगण्यात आलं आहे की यासिरचा १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार ब्लास्टमध्ये सक्रीय सहभाग असल्याचा दावा देखील एनआयएने केला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, तपास संस्थेने जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशातील अनेक आरोपी आणि संशयितांच्या ठिकाणांवर व्यापक शोधमोहीम राबवली होती. यादरम्यान अनेक डिजिटल उपकरणे आणि गुन्ह्याशी संबंधित आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.

प्रमुख आरोपींवर कारवाई: याआधी मुख्य आरोपी डॉ. मुजम्मिल शकील गनी आणि डॉ. शाहीन सईद यांच्या फरीदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटी कॉम्प्लेक्समधील ठिकाणांवर आणि इतर घरांवर अशाच प्रकारे छापे टाकण्यात आले होते.

दिल्लीतील हा कार बॉम्बस्फोट डॉ. उमर याने घडवून आणला होता. यासाठी लागणारी स्फोटके या 'डॉक्टरांच्या मॉड्यूल'ने (Doctors' module) गेल्या २-३ वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर जमा करून ठेवली होती.

या भीषण स्फोटात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT