Delhi airport gold seized: File Photo
राष्ट्रीय

Delhi airport gold seized: अंतर्वस्त्रांत लपवले ४७ लाखांचे सोने; दिल्ली विमानतळावर दोन प्रवाशांना अटक

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ३३२ ग्रॅम वजनाच्या आणि अंदाजे ४७.३८ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन साखळ्या जप्त केल्या आहेत.

मोहन कारंडे

Delhi airport gold seized:

नवी दिल्ली: शारजाहहून आलेल्या दोन प्रवाशांकडून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ३३२ ग्रॅम वजनाच्या आणि अंदाजे ४७.३८ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन साखळ्या जप्त केल्या आहेत.

अधिकृत निवेदनानुसार, शुक्रवारी टर्मिनल ३ वर ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर, जागेवरच ओळख पटवल्यानंतर या प्रवाशांना अडवण्यात आले. त्यांच्या सामानात कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नसली तरी, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर द्वारे तपासणी करताना मोठा बीप वाजल्याने सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांची वैयक्तिक झडती घेतली.

मेटल डिटेक्टरच्या मदतीने प्रवाशांनी सोने लपवल्याचा प्रकार उघडकीस आला. अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवलेल्या ३३२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या साखळ्या जप्त केल्या. सोन्याच्या साखळ्या काळ्या टेप आणि कार्बन पेपरमध्ये गुंडाळून ठेवल्या होत्या. या सोन्याच्या साखळ्या सीमाशुल्क कायद्यांतर्गत जप्त करण्यात आल्या असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

'डिजिटल अरेस्ट'मध्ये फसवणूक झाल्यास बँकांनी द्यावी नुकसानभरपाई

बँकांच्या निष्काळजीपणामुळे 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणात फसवणूक झाल्यास पीडिताला नुकसानभरपाई देण्याचे आणि बँकेविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात, अशी अत्यंत स्पष्ट आणि कडक भूमिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी घेतली. संशयिताला नुकसानभरपाई देण्याबरोबरच जबाबदार व्यक्तीवर खटले दाखल करण्याचीही आम्ही विचार करत आहोत, असे न्यायालयाने बजावले.

डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली वाढत्या सायबर फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी सतत जनजागृती मोहीम राबवून आणि फसवणुकीच्या बातम्या समोर येत असतानाही सुशिक्षित लोक भामट्यांच्या जाळ्यात कसे अडकत आहेत,

असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले की, मोबाईल फोनवर शिक्षेची किंवा अटकेची धमकी देण्याला घाबरण्याऐवजी लोकांनी त्याची सत्यता पडटळून पाहिली पाहिजे.

गुरुवारी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचे खंडपीठ डिजिटल अरेस्ट प्रकरणावर सुनावणी करत आहे. कोर्टाने स्वतःहून या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुमोतो दाखल करून घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT