D Subbarao On Freebies:
भारतात गेल्या काही निडवणुकांमध्ये अनेक योजनेअंतर्गत लोकांना मोफत पैसे देण्याचं चलन सुरू झालं आहे. मध्य प्रदेशातील लाडली बहन, महाराष्ट्रातील लाडकी बहीण अन् नुकत्याच झालेल्या बिहार निडवणुकीत महिलांच्या खात्यात १० हजार रूपये ट्रन्सफर करणे या सारख्या योजनांचा समावेश आहे. याच मोफत पैसे देण्याच्या योजनेवरून आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी एक मोठा इशारा दिला आहे.
त्यांनी अशा मोफत पैसे वाटण्याच्या योजना तुम्हाला निवडणुका जिंकून देऊ शकतात मात्र या योजनांमुळे देश निर्मिती होत नाही. हे सांगताना सुब्बाराव यांनी बिहार पासून आंध्र प्रदेशच्या निवडणुकांचे उदाहरण दिले. सुब्बराव यांनी अशा प्रकारच्या योजनांच्या आधारे राजकीय पक्ष निवडणुकीत फक्त एकमेकांच्या पुढे जाण्याच्या स्पर्धेत लागले आहेत.
बिझनेस टुडेमध्ये छापलेल्या एका वृत्तात माजी आरबीआय गव्हर्नर सुब्बाराव म्हणतात बिहार निवडणुकीत एनडीएने महिलांच्या खात्यात १० हजार रूपये ट्रान्सफर केले. तर काँग्रेस-आरजेडीने त्याच्या पुढे जाऊन महिलांना ३० हजार रूपये देण्याचे आणि प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. सुब्बाराव यांच्या मते या सर्व आश्वासन वास्तवाला धरून नाहीत.'
सुब्बाराव यांच्या मते राजकीय पक्ष पैसे तर वाटतात. मोठ्या घोषणा करतात मात्र या घोषणांचा वास्तवात खूप कमी प्रभाव पडतो. काही मतं प्रभावित होत असतील मात्र दावे प्रतीदावे आणि आश्वासनांमुळे एकमेकांची आश्वासने बेअसर होतात. जेवढे मोठी आश्वासने तेवढा लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होतो.
अशी आश्वासने देऊन सत्तेत आलेली सरकारे आता मात्र ही आश्वासने पूर्ण करताना संघर्ष करताना दिसत आहेत. यासाठी सुब्बाराव यांनी आंध्र प्रदेशचं उदाहरण दिलं. त्यांनी आता या राज्याला जाणीव होत आहे की त्यांच्या कल्याणकारी योजना या खूप महागात पडत आहेत. तेलंगणा अनेक वर्षे मोठमोठ्या कल्याणकारी योजाना राबवून आता मोठ्या आर्थिक तुटीला सामोरा जात आहे.
डी सुब्बाराव हे २००८ ते २०१३ या दरम्यान आरबीआयचे गव्हर्नर राहिले आहेत. त्यांच्या मते ज्या देशात लाखो लोक दैनिक गरजा भागवण्यासाठी संघर्ष करत आहेत. तिथं कल्याणकारी योजाना गरजेच्या आहेत. मात्र कॅश ट्रान्फरचा जास्त वापर विशेष करून उधार घेऊन दिलेले पैसे विकासाला खीळ घालतात. त्यामुळं मानवी आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगार अशा सुधारणा मागं पडत जातात.
सुब्बाराव यांच्या मते फुकटात दिलेली प्रत्येक गोष्ट ही राजकीय विफलतेचं प्रतिक आहे. यासाठी त्यांनी माओच्या काही ओळींचा संदर्भ दिला. ते म्हणतात, 'कोणत्याही व्यक्तीला एक मासा दिला तर तुम्ही एका दिवसासाठी त्याचे पोट भराल. मात्र तुम्ही त्याला मासे पकडायला शिकवलं तर तो आयुष्यभर आपलं पोट भरू शकतो.'