Cyclone Ditwah Operation Sagar Bandhu:
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज (दि. २९) भारताचं ऑपरेशन सागर बंधू लाँच केल्याची माहिती दिली. भारताचे C-130J एअरक्राफ्ट जवळपास १२ टन मानवी सहाय्यता घेऊन श्रीलंकेला रवाना झालं आहे. श्रीलंकेला दितवाह चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. त्यामध्ये आतापर्यंत ८० लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, याबाबत एस जयशंकर यांनी एक्सवर ट्विट करत याची माहिती दिली. ते ट्विटमध्ये लिहितात, 'ऑपरेशन सागर बंधू सुरू झालं आहे. भारतीय हवाई दलाचं एमसीसी C-130J विमान जवळपास १२ टन मानवी सहाय्यता ज्यात तंबू, ताडपदरी, ब्लँकेट, हायजीन कीट, रेडी टू इट खाद्यपदार्थ कोलंबोला रवाना करण्यात आली आहेत.'
भारतानं श्रीलंकेतील वादळ प्रभावित भागांना मदत करण्यासाठी त्वरित ऑपरेशन सागर बंधू लाँच केलं आहे. या मोहिमेअंतर्गत भारतानं मदतीची पहिली खेप इंडियान नेव्ही एअरक्राफ्ट कॅरिअर आयएनएस विक्रांत आणि वॉरशिप आयएनएस उदयगिरी शुक्रवारी कोलंबो इथं पोहचली आहेत. त्यांनी भारताची मदत श्रीलंकेच्या प्रशासनाकडं सुपूर्द केली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट केलं होतं. त्यांनी ट्विट करून श्रीलंकेच्या लोकांच्या वेदनेत सहभागी असल्याचं सांगितलं. त्यांनी वादळात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्याप्रती सहवेदना व्यक्त केली. त्याचबरोबर मोदी यांनी श्रीलंकेला समुद्रातील सर्वात जवळचा मित्र असं संबोधत भारतानं त्वरित मानवी सहाय्यता पाठवल्याचही सांगितलं.
श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळानं धुमाकूळ घातला आहे. या वादळामुळं अनेक इमारतींचे नुकासन झालं आहे. त्यामुळं या वादळामुळं मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत श्रीलंकेत या वादळाच्या तडाख्यामुळं जवळपास ८० लोकांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळं श्रीलंकेच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे.
आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार ६१ लोकांचा मृत्यू झाला असून २५ लोक बेपत्ता आहेत. जवळपास ४४ हजार लोकं आणि १२ हजार कुटुंबे या वादळामुळं प्रभावित झाली आहेत. १६ नोव्हेंबरपासूनच श्रीलंकेतील हवामान बिघडलं होतं.