Airbus A320 Flight Control Issue: सूर्य किरणांमुळे विमान नियंत्रण प्रणालीत गडबड; भारतातील २०० उड्डाणे प्रभावित

विमान प्रवास करणार आहात... बातमी तुमच्यासाठी! एअर बसचं इतिहासातील सर्वात मोठं रिकॉल! जगभरातील तब्बल ६००० विमाने प्रभावित, भारतातील जवळपास २०० उड्डाणे प्रभावित
Airbus A320
Airbus A320 Flight Control Issuepudhari photo
Published on
Updated on

Airbus A320 Flight Control Issue:

भारतातील इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या अनेक उड्डाणांना अडचणी येत आहेत. ए ३२० कंपनीच्या विमानांमध्ये एक तांत्रिक बिघाड झाल्याचं फ्रान्सची विमान कंपनी एअरबसने सांगितलं. एअरबसनं सांगितलं की सूर्याची किरणे फ्लाईट कंट्रोल सिस्टमसाठी आवश्यक असलेला डेटा खराब करत आहे. हा डेटा चुकीचा असेल तर त्याचा विमान नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो.

Airbus A320
Tejas Fighter Jet Crash: दुबई एअर शोमध्ये मोठी दुर्घटना: भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले, व्हिडिओ आला समोर

उड्डाणांवर होणार परिणाम

भारतात सध्या ५६० पेक्षा जास्त ए ३२० विमानं आहेत. त्यातील जवळपास २०० ते २५० विमानांमध्ये त्वरित तपासणी आणि बदल करण्याची गरज आहे. काही विमानांमध्ये सॉफ्टवेअर बदलावी लागतील तर काही विमानामधील हार्डवेअर रिप्लेस करावे लागणार आहेत. या दुरूस्तीसाठी विमानांना ग्राऊंडवर असणं गरजेचं आहे. त्यामुळं देशातील अनेक उड्डाणे ही उशीराने किंवा रद्द देखील होऊ शकतात.

युरोपियन युनियन एविएशन सेफ्टी एजन्सीने याबाबत आपत्कालीन नोटीस जारी केली आहे. त्यांनी काही विमानांना चांगले इएलसी कंप्युटर लावणे गरजेचे असल्याचं म्हटलं आहे. एअरबसच्या एका प्रवक्त्यानं या तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी आणि दुरूस्ती प्रक्रियेमुळं जवळपास ६ हजार विमानांवर याचा परिणाम होणार आहे.

Airbus A320
Beed Fraud Case : स्वस्त विमान तिकिटांच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक

एअर इंडियाची पोस्ट

एअर इंडिया एक्सप्रेसनं पोस्ट करून एअरबस ए ३२० विमानांबाबत सॉफ्टवेअरच्या बाबतीत अलर्ट मिळाल्यानंतर खबरदारी घेतली जात आहे. कंपनीनं सांगितलं की त्यांच्या जास्तीजास्त विमानांमध्ये या समस्येचा प्रभाव पडलेला नाही. मात्र जागतिक निर्देशांमुळं काही उड्डाणे उशीरा तर काही रद्द होऊ शकतात.

कंपनीनं आपल्या प्रवाशांना संपर्क क्रमांका अपडेट ठेवण्याचे आणि आपल्या उड्डाणाबाबतची ताजी माहिती वेबसाईट किंवा चॅटबॉट, मोबाईल अॅपवर चेक करत रहा असा सल्ला दिला आहे.

Airbus A320
Nashik Airline | एअर इंडिया विमान अपघाताचा 'इंडिगो'ला हादरा

इतिहासातील सर्वात मोठं रिकॉल

नुकतेच एका ए ३२० विमानात विमान ऑटोपायलटवर असताना कोणत्याही कमांडशिवाय ते हलके खाली आले होते. त्यावेळी या विमानाची तपासणी केली असता इएलएसी मॉड्युलमध्ये बिघाड असल्याचं समोर आलं होतं. कंपनीला आपल्या काही विमानांमध्ये पार्ट्स किंवा सिस्टमची तपासणी किंवा त्यात बदल करावे लागत आहेत.

त्यामुळं कंपनीनं आपली विमाने तपासणीसाठी रिकॉल केली आहेत. एअरबासच्या ५५ वर्षाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा रिकॉल मानला जात आहे. विशेष म्हणजे काही आठवड्यापूर्वीच एअरबसचे ए ३२० मॉडेल जगातील सर्वात जास्त विकलं जाणारं मॉडेल ठरलं होतं. त्यानं बोइंग ७३७ ला मागं टाकलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news