किरण गेल्या तीन वर्षांपासून एका तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. 
राष्ट्रीय

Crime News | हृदयद्रावक! प्रेयसीच्या लग्नाची पत्रिका पाहताच बॉडीबिल्डरने उचलले टोकाचे पाऊल

गर्लफ्रेंडच्या साखरपुड्यानंतर जीवन संपविण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रेयसीसह तिच्या आईचा उल्लेख

पुढारी वृत्तसेवा

bodybuilder ended his life

बंगळूरू: प्रेयसीचे लग्न दुसऱ्या पुरुषाशी ठरल्याचे समजल्याने एका २६ वर्षीय बॉडीबिल्डरने आपल्या राहत्या घरी जीवन संपविण्याची धक्कादायक घटना बेंगळुरूच्या महालक्ष्मी लेआउट परिसरात घडली आहे. किरण असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

रिपोर्टनुसार, किरण गेल्या तीन वर्षांपासून एका तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. शनिवारी त्या तरुणीने तिचे लग्न ठरल्याची माहिती किरणला दिली. इतकेच नाही तर तिने लग्नाची पत्रिका आणि लग्नासाठी घेतलेली साडीही त्याला दाखवली. या भेटीनंतर किरण प्रचंड मानसिक धक्क्यात होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

कुटुंबीयांना बसला धक्का

त्या तरुणीला भेटून घरी परतल्यानंतर किरण अत्यंत अस्वस्थ होता. तो आपल्या खोलीत गेला आणि त्याने आतून दरवाजा लावून घेतला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी किरण मृतावस्थेत आढळून आला.

जीवन संपविण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी केली जप्त

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांना घटनास्थळी एक ‘चिठ्ठी’ सापडली आहे. यामध्ये किरणने आपल्या मृत्यूला प्रेयसी आणि तिची आई जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून त्यातील मजकुराची पडताळणी सुरू आहे. “आम्ही घटनेच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहोत. सुसाईड नोटमधील आरोपांची चौकशी केली जाईल आणि या टोकाच्या निर्णयामागे आणखी काही कारणे होती का, याचाही तपास केला जाईल,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT