Hathras Stampede Bhole Baba
Hathras stampede | हाथरस चेंगराचेंगरी; मृत मुलीला जिवंत करण्याप्रकरणात भोले बाबांवर गुन्हा दाखल झाला होता. File Photo
राष्ट्रीय

Hathras stampede | 'दिव्य शक्तीने मृतांनाही जिवंत करू शकतो' - भोलेबाबा आले होते अडचणीत

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात नारायण साकार विश्व हरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबाच्या सत्‍संग कार्यक्रमानंतर झालेल्‍या चेंगराचेंगरीत १३३ भाविकांचा मृत्‍यू झाला. दरम्यान 'जादुई शक्ती' वापरून मृत मुलीला जिवंत करण्याचा दावा भोले बाबा यांनी केला होता. यानंतर स्मशासनभूमीत गोंधळ उडाला. दरम्यान बाबा आणि त्याच्या अनुयायांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

कर्करोगाने मरण पावलेल्या मुलीचे पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न केल्याने स्मशानभूमीत गोंधळ उडाला होता. खोटे दावे करून गोंधळ निर्माण केल्याप्रकरणी भोले बाबा आणि त्याच्या अनुयायांना अटक करण्यात आली होती. हातसर येथील घटनेनंतर भोले बाबाचे पितळ उलगडलं आहे.

नारायण साकार विश्व हरी भोले बाबा, त्यांची पत्नी आणि इतर चार जणांना 1998 मध्ये आग्रा येथील मृत मुलीला पुन्हा जीवंत करतो असे सांगत "जादुई शक्ती" असल्याचा दावा केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. शाहगंजचे एसएचओ तेजवीर सिंग म्हणाले की, या प्रकरणात कर्करोगाने मरण पावलेल्या १६ वर्षीय मुलीला पुन्हा जीवंत करण्याचा दावा या बाबाने केला होता. त्यामुळे स्मशानभूमीत मोठा गोंधळ उडाला होता, अशी माहिती समोर आली आहे.

भोले बाबावर आयपीसी कलम 109 आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायद्यांतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पंकज कुमार म्हणाले की, बाबांनी त्यांची भाची दत्तक घेतली होती. तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. ती एके दिवशी बेशुद्ध पडल्यानंतर, त्याने असा दावा केला की तो या मृत मुलीला जिवंत करू शकतो. ती शुद्धीवर आली पण काही वेळातच तिचा मृत्यू झाला.

यानंतर " बाबाचे अनुयायी सूरजपाल हे २०० हून अधिक लोकांसह, स्मशानभूमीत पोहोचले आणि कुटुंबाला पटवून देण्याचा प्रयत्न केला की तो तिला पुन्हा जिवंत करू शकतात," दरम्यान बाबांच्या अनुयायांनी बळजबरीने मृतदेह ताब्यात घेतला. आम्ही पोहोचलो तेव्हा त्याने आणि त्याच्या समर्थकांनी आमच्यावर दगडफेक केली. आम्ही सूरजपाल, त्याची पत्नी आणि इतरांना अटक केली, अशी माहिती पंकज कुमार यांनी सांगितल्याची माहिती देखील येथील पोलिस अधिकारी सिंह यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

SCROLL FOR NEXT