हाथरस दुर्घटना 'इफेक्‍ट' : वृंदावनच्‍या प्रेमानंद महाराजांनी बंद केली पदयात्रा

भाविकांना रस्‍त्‍यावर गर्दी न करण्‍याचे आवाहन
Premanand Maharaj
हाथरसमधील चेंगराचेंगरीच्‍या दुर्घटनेनंतर वृंदावनच्‍या प्रेमानंद महाराजांनी आपली दरराेज काढण्‍यात येणारी पदयात्रा बंद केली आहे. Twitter

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात नारायण साकार विश्व हरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबाच्या कार्यक्रमानंतर झालेल्‍या चेंगराचेंगरीत १२७ भाविकांचा मृत्‍यू झाला. या दुर्घटनेची गंभीर दखल वृंदावनच्‍या प्रेमानंद महाराजांनी घेतली आहे. त्‍यांनी दररोज रात्री उशिरा भाविकांना भेटण्‍यासाठी काढण्‍यात येणारी पदयात्रा त्‍यांनी बंद केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी भाविकांनी रस्त्यावर उभे राहून संताच्या दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहनही त्‍यांनी भाविकांना लिहिलेल्‍या पत्राच्‍या माध्‍यमातून केले आहे.

संत प्रेमानंद यांच्या रामनेराती परिसरात असलेल्या श्रीहित राधा केली कुंज आश्रमातील संत आश्रमातून हाथरस घटनेनंतर जारी करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, हाथरसमधील घटना दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे, त्याबद्दल आमची सहानुभूती आहे. भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये, अशी प्रार्थना त्यांनी ठाकुरजींकडे केली आहे.

हाथरसच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संत प्रेमानंद महाराज रात्री 2.15 वाजता त्यांच्या छटिकारा मार्गावरील निवासस्थानातून श्रीहित राधाकेली कुंज या आश्रमात जात असत. या काळात भक्त त्यांच्या दर्शनासाठी रस्‍त्‍यावर उभे असत. आता ही पदयात्रा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी दर्शनासाठी रस्त्यावर उभे राहू नका, रस्त्यावर कोणत्याही प्रकारची गर्दी निर्माण करू नका, असा संदेश त्यांनी भाविकांना दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news