Hathras Stampede
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी भाेले बाबाच्‍या आश्रमातील ६ सेवादारांना अटक करण्‍यात आली आहे. File Photo

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई : सहा सेवादारांना अटक

भोले बाबाच्‍या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चाैकशी सुरु

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात नारायण साकार विश्व हरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबाच्या सत्‍संग कार्यक्रमानंतर झालेल्‍या चेंगराचेंगरीत १२७ भाविकांचा मृत्‍यू झाला आहे. या दुर्घननेनंतर भोले बाबा हा अद्याप फरार आहे. पोलिसांनी मैनपुरीच्या आश्रमात त्याचा शोध घेतला मात्र तो अद्याप सापडला नाही. पोलिसांनी भोले बाबाच्‍या आश्रमातील सहा सेवादारांना अटक करण्‍यात आली आहे, अशी माहिती अलिगडचे पोलीस महानिरीक्षण शलभ माथूर यांनी आज (दि.४ जुलै) माध्‍यमांशी बोलताना दिली.

शलभ माथूर म्हणाले की, "हाथरसमध्‍ये चेंगराचेंगरी प्रकरणी सहा सेवेदारांना अटक करण्‍यात आली आहे. ते घटनास्थळावरून पळून गेले होते. मुख्य आरोपी प्रकाश मधुकर याच्या अटकेवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले जात आहे. लवकरच त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येईल, ही घटना एखाद्या कटातून घडली आहे का, याचीही चौकशी केली जाईल."

भोले बाबाच्या' गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी हाेणार

हातरस चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत अलीगढचे पोलीस महानिरीक्षक शलभ माथूर माध्‍यमांशी बोलताना म्हणाले की, "आम्ही 'भोले बाबाच्या' गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी करत आहोत. त्यांच्या नावावर कार्यक्रमाची परवानगी घेण्यात आली नव्हती."

पोलिस, प्रशासकीय अधिकारी आणि मदतीसाठी आलेल्या इतर लोकांना मृतदेह उचलू दिला नाही. बाबांच्या आशीर्वादाने बरा होणार असल्याचे सांगितले. बंदोबस्तात गुंतलेले सर्व सेवक घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेमागे कट असल्याचा संशयही मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी व्‍यक्‍त केला आहे.सत्‍संग कार्यक्रम झाल्‍यानंतर सेवादार आणि बाबाच्या वैयक्तिक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे प्रशासनाने म्‍हटले आहे. या प्रकरणी बााबा भोलेच्‍या सहा सेवादारांना अटक केली असून, बाबाचा शोध सुरु आहे.

logo
Pudhari News
pudhari.news