काँग्रेसचा सर्वात मजबूत बालेकिल्ला असलेल्या कर्नाटकमधून पक्षाध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन खेडा यांना राज्‍यसभेची उमेदवारी देण्‍यात आली आहे.  Pudhari
राष्ट्रीय

Congress RS candidates 2026 |पवन खेडांच्या 'तपस्ये'ला फळ, खर्गेंसोबत कर्नाटकातून जाणार संसदेत

काँग्रेसची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर, मीनाक्षी नटराजन यांना मध्य प्रदेशातून तिकीट

पुढारी वृत्तसेवा

Congress Rajya Sabha candidate list

नवी दिल्‍ली : काँग्रेसने गुरुवारी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी सात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू आणि झारखंडमधील रिक्त जागांसाठी काँग्रेसने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

काय आहे 'तपस्ये'चा जुना संदर्भ?

तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या खेडा यांनी सोशल मीडियावर एक ओळ लिहून आपली खंत व्यक्त केली होती. ही पोस्‍ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. या पोस्‍टमध्‍ये त्‍यांनी म्‍हटलं होतं, "कदाचित माझ्या तपस्येतच काहीतरी कमतरता राहिली असावी." आता २०२६ च्या राज्‍यसभेच्‍या नवीन यादीने खेडा यांच्या त्याच 'तपस्ये'चे फळ देत त्यांना संसदेचे तिकीट बहाल केले आहे.

कर्नाटकमधून तीन दिग्गजांना रिंगणात

  • मल्लिकार्जुन खर्गे: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे स्वतः कर्नाटकमधून वरिष्ठ सभागृहासाठी (राज्यसभा) नशीब आजमावणार आहेत.

  • पवन खेडा: पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि पक्षाचा आक्रमक चेहरा आहेत.

  • मंसूर अली खान: अल्पसंख्याक समुदायाचा एक मोठा चेहरा म्हणून त्यांना कर्नाटकमधून तिसऱ्या जागेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातून मीनाक्षी नटराजन, राजस्थानमधून नीरज डांगी

राहुल गांधी यांच्या कोअर टीमच्या जुन्या आणि अत्यंत विश्वासू सदस्या राहिलेल्या माजी खासदार मीनाक्षी नटराजन यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेचे तिकीट देण्यात आले आहे. मंदसौरच्या लोकसभा खासदार राहिलेल्या नटराजन यांना वरिष्ठ सभागृहात पाठवून काँग्रेसने माळवा परिसर आणि महिला नेतृत्वाला मोठी ताकद दिली आहे. तसेच राजस्थानमधील विद्यमान राज्यसभा खासदार नीरज डांगी यांच्यावर काँग्रेस हायकमंडने पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे.

तमिळनाडूतून प्रवीण चक्रवर्ती तर झारखंडमधून प्रणव झा

काँग्रेसच्या डेटा आणि अ‍ॅनालिटिक्स विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांना तमिळनाडू कोट्यातून राज्यसभेवर पाठवले जात आहे. प्रवीण चक्रवर्ती यांची गणना राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळच्या धोरणात्मक सल्लागारांमध्ये केली जाते.ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे (AICC) सचिव आणि कम्युनिशन (संचार) विभागाशी जोडलेले ज्येष्ठ नेते प्रणव झा यांना झारखंडमधून राज्यसभेचे तिकीट देण्यात आले आहे. मीडिया मॅनेजमेंट आणि संघटनेत 'संकटमोचक' म्हणून भूमिका बजावणाऱ्या प्रणव झा यांच्यासाठी हा एक मोठा संघटनात्मक पुरस्कार मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT