Cockroach Janta Party Pudhari
राष्ट्रीय

Cockroach Janta Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धमाका! अवघ्या 4 दिवसांत BJPलाही टाकलं मागे; इन्स्टाग्रामवर किती फॉलोअर्स झाले?

Cockroach Janta Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)चे अवघ्या चार दिवसांत Instagram वर BJP पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. CJP चे 10.9 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Cockroach Janta Party: सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच ‘राजकीय पक्षाची’ जोरदार चर्चा सुरू आहे. नाव ऐकून अनेकांना सुरुवातीला हा विनोद वाटला, पण आता हा ट्रेंड चर्चेचा विषय बनला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) नावाच्या व्यंगात्मक मोहिमेने अवघ्या चार दिवसांत इन्स्टाग्रामवर मोठा विक्रम करत भाजपलाही मागे टाकलं आहे.

4 दिवसांत BJP पेक्षा पुढे

उपलब्ध माहितीनुसार, ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)च्या Instagram अकाउंटवर सध्या तब्बल 10.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) अधिकृत अकाउंटवर सुमारे 8.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

विशेष म्हणजे, भाजपने हजारो पोस्ट्स केल्यानंतर हा आकडा गाठला आहे. तर दुसरीकडे, CJP ने केवळ 56 पोस्ट्समध्येच हा मोठा टप्पा गाठल्याची चर्चा रंगली आहे.

नेमकी काय आहे ‘कॉकरोच जनता पार्टी’?

‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना अभिजीत दिपके यांनी केल्याचं सांगितलं जात आहे. ते सध्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेत असून राजकीय संवाद रणनीतीकार म्हणून काम करतात.

ही मोहीम सोशल मीडियावर एका वादग्रस्त वक्तव्यानंतर सुरू झाल्याचं बोललं जात आहे. काही अहवालांनुसार, बेरोजगार तरुणांबाबत झालेल्या एका वादग्रस्त टिप्पणीच्या निषेधातून या ‘पक्षाचा’ जन्म झाला.

मीम्स, व्यंग आणि तरुणांचा प्रतिसाद

CJP च्या लोकप्रियतेमागे मीम कल्चर आणि सोशल मीडियावरील व्यंगात्मक पोस्ट्स हे मोठं कारण मानलं जात आहे. “अबकी बार 10 million पार” सारख्या घोषणांनी सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड निर्माण केला आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, हा ट्रेंड केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून तरुणांमधील नाराजी व्यक्त करण्याचं एक डिजिटल माध्यम म्हणूनही पाहिला जात आहे.

राजकारण्यांचाही प्रतिसाद

या मोहिमेला काही प्रमुख राजकीय नेत्यांनीही प्रतिसाद दिला आहे. महुआ मोईत्रा आणि अखिलेश यादव यांसारख्या नेत्यांनी या ट्रेंडबाबत पोस्ट केल्या आहेत.

‘कॉकरोच जनता पार्टी’ हा अधिकृत राजकीय पक्ष नसून व्यंगात्मक सोशल मीडिया चळवळ म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जात आहे. पण अवघ्या काही दिवसांत तिने मिळवलेली लोकप्रियता सोशल मीडियाच्या ताकदीचं मोठं उदाहरण मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT