Cockroach Janata Party Pudhari
राष्ट्रीय

Cockroach Janata Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’चं X अकाउंट भारतात ब्लॉक; इन्स्टाग्रामवर BJPला मागे टाकल्यानंतर मोठी कारवाई?

Cockroach Janata Party X Account: इन्स्टाग्रामवर BJP पेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवल्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे X अकाउंट भारतात ब्लॉक झाल्याचा दावा केला जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

Cockroach Janata Party X Account: सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर BJP च्या अधिकृत अकाउंटपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवल्यानंतर काही तासांतच CJP चं X (पूर्वीचं Twitter) अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

संस्थापकांचा दावा काय?

CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत, “अपेक्षेप्रमाणे, कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आलं आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. X कडून किंवा संबंधित अधिकृत संस्थांकडून याबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.

Instagram वर BJPला मागे टाकल्याचा दावा

काही अहवालांनुसार, CJP ने Instagram वर 10 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स मिळवत भाजपच्या अधिकृत अकाउंटला फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकलं. BJP च्या Instagram अकाउंटवर सुमारे 12 दशलक्ष फॉलोअर्स असल्याचं सांगितलं जात आहे. या अचानक वाढलेल्या लोकप्रियतेमुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ इंटरनेटवरील चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमकी काय आहे ‘कॉकरोच जनता पार्टी’?

‘कॉकरोच जनता पार्टी’ हा पारंपरिक राजकीय पक्ष नसून व्यंग, मीम्स आणि डिजिटल आंदोलनाचं मिश्रण असलेली सोशल मीडिया मोहीम आहे. बेरोजगारी, पेपरफुटी, राजकीय वातावरण आणि तरुणांमधील नाराजी या मुद्द्यांवर ही मोहीम जोरदार चर्चेत आली.

स्वतःला “तरुणांची, तरुणांसाठी आणि तरुणांनी उभारलेली चळवळ” असं सांगणाऱ्या या मोहिमेने काही दिवसांतच मोठा डिजिटल प्रभाव निर्माण केला आहे.

वादातून जन्मलेला ट्रेंड?

या मोहिमेची सुरुवात एका वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर झाली असल्याचं बोललं जात आहे. बेरोजगार तरुणांबाबत करण्यात आलेल्या कथित टिप्पणीवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असताना या व्यंगात्मक मोहिमेचा जन्म झाला. आता X अकाउंट ब्लॉक झाल्याच्या दाव्यानंतर हा ट्रेंड आणखी वेगाने चर्चेत आला असून, सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT