who is Founder Of CJP pudhari
राष्ट्रीय

who is Founder Of CJP: 'गंमत मधी' काढलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' चे आहे छत्रपती संभाजी नगर कनेक्शन; कोण आहे अभिजीत दीपके?

भारतीय राजकारणात खळबळ उडवून देणारा बॉस्टन रिटर्न मराठमोळा अभिजीत दीपके आहे तरी कोण?

Anirudha Sankpal

who is founder Of cockroach janata party : सोशल मीडियावर गेल्या ७२ तासापासून एक विचित्र नाव ट्रेंड करत आहे. हे नाव कॉकरोच जनता पार्टी असं आहे. विशेष म्हणजे फक्त तीन दिवसात या राजकीय पक्षाशी देशात १ लाखापे जास्त युवा जोडले गेले आहेत. इन्स्टाग्रामवर तर २० लाख लोकांनी फोलो केले आहे. या सर्व कॉकरोच जनता पार्टीच्या केंद्रस्थानी एक ३० वर्षाचा युवक आहे. या युवकाचे नाव अभिजीत दीपके आहे.

इंटरनेटवर बेरोजगारांची आणि आळशी लोकांचा आवाज असल्याचा दावा या पक्षाने केला आहे. अभिजीतला ही कॉकरोच पार्टी काढण्याची कल्पना कशी सुचली याची पार्श्वभूमी काय याबाबत जाणून घेऊयात...

कोण आहे अभिजीत दीपके?

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरचा मूळचा असलेला अभिजीत दीपके हा एक प्रोफेशनल पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट आहे. अभिजीतने पुण्यातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. तिथं त्यानं बॉस्टन विद्यापीठात पब्लिक रिलेशन मधून एमएस ही पदवी मिळवली.

राजकीय कनेक्शन काय?

अभिजीत दीपकेला राजकीय मेसेजिंग देण्याचा जुना अनुभव आहे. त्याने २०२० पासून २०२२ पर्यंत आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया टीममधील एका प्रमुख वॉलेंटियर म्हणून काम केलं आहे. २०२० त्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पक्षाच्या मीम्सचा पूर आला होता. त्यापाठीमागे अभिजीतचेच डोके होते. दिल्लीच्या शिक्षण विभागात त्याने कम्युनिकेशन सल्लागार म्हणून देखील काम केलं आहे.

कॉकरोच जनता पार्टीचा जन्म कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार या मोहीमेची सुरूवात सर्वोच्च न्यायालयाच्या एका टिप्पणीनंतर झाली. १५ मे २०२६ रोजी खोट्या डिग्रीसंदर्भातील एका केसमध्ये सुनावणी करताना चीफ जस्टीस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी बेरोजगार लोक कॉकरोच सारखे बाहेर येतात आणि लॉ, मीडिया आणि आरटीआय अॅक्टिव्हिजम सारख्या सिस्टममध्ये घुसतात असं वक्तव्य केलं होतं.

नंतर सूर्यकांत यांनी त्यांचे हे वक्तव्य बेरोजगार युवकांसाठी नाही तर खोट्या डिग्री घेण्याऱ्याबाबत होते असं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र तोपर्यंत युवकांचा आक्रोश वाढला होता. नीट पेपर लीक आणि रोजगार न मिळाल्यामुळं युवक त्रस्त आहेत. याच रागाला अभिजीतने वाट मोकळी करून दिली. त्याने १६ मे रोजी एक्सवर गंमतीत जर सगळे कॉकरोच एकत्र आले तर? अशी पोस्ट केली. त्यानंतर त्याने कॉकरोच जनता पार्टी नावाची एक वेबसाईट आणि गुगल फॉर्म लाईव्ह केला.

द वीकच्या रिपोर्टनुसार अभिजीतने या पार्टीत सामील होण्यासाठी एक अट ठेवली आहे. त्याने पात्रतेमध्ये बेरोजगार, आळशी, क्रोनिकली ऑनलाईन आणि प्रोफेशनली रडगाणे गाणाऱ्यांनाच या पक्षात येता येईल अशी मजेशीर अट ठेवली. ही अट जेन झींना चांगलीच आवडली.

पाहता पाहता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि किर्ती आझाद सारख्या मोठ्या नेत्यांनी देखील या पार्टीचे समर्थन केलं. जरी हे गंमत गंमत मध्ये सुरू झाले असले तरी नीट पेपर लीक, बेरोजगारी, युवकांचा मानसिक तणाव यामुळं राजकीय पटलावर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT