CJP Protest Human Bomb pudhari
राष्ट्रीय

CJP Protest Human Bomb: सीजेपीचा सह संयोजक म्हणतो आम्ही त्यांच्यासाठी मानवी बॉम्ब सारखे... कुठेही जाऊन फुटतो

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कोणती गोष्ट मान्य केली जाणार नाही असं देखील ठणकावून सांगण्यात आलं.

Anirudha Sankpal

CJP Protest Human Bomb: कॉकरोच जनता पार्टीचे सह संयोजक सौरभ दासने एका मुलाखतीत त्यांना तिहार जेलमध्ये आठवडाभर राहणे मजेशीर होतं. मात्र बाहेर आल्यानंतर सौरभ दासने एका टार्गेट सेट केल्याचं सांगितलं. दासने सांगितलं की आता आमचे एक नंबरचे टार्गेट हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. त्यांना तर जावेच लागेल असा इशारा देखील त्याने दिला.

कसे होते जेलमधील दिवस?

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कोणती गोष्ट मान्य केली जाणार नाही असं देखील ठणकावून सांगण्यात आलं. तसेच मुलाखतीत सौरभ दासने चेष्टेत सांगितलं की आम्ही सरकारसाठी एक ह्युमन बॉम्ब आहोत. आम्ही कुठंही फुटू शकतो.

रेड माईक ला दिलेल्या मुलाखतीत सौरभ दासने तिहार जेलमधील आपल्या त्या ८ दिवसांबाबत सांगितलं. तो म्हणाला की तिहारमधील मला माझे वास्तव्य आवडलं. एकंदर मजा आली. तू जेलमध्ये बोअर झाला नाहीस का असे विचारले असता त्याने मला माझ्या गॅझेटची खूप गरज होती. कारण आमचे आंदोलनच ऑनलाईन होतं. आम्हाला डिटॉक्स होता येत नव्हतं. एका वेळी मी दोन मोबाईल वापरत होतो. मात्र तिहार जेलमध्ये असताना मी माझ्या फोनला अजीबात मिस केलं नाही.

तिहारमध्ये खूप हिरवळ

सौरभ दासने सांगितलं की, 'आम्हाला इतका विश्वास होता की तिहार मध्ये सात महिने किंवा सात वर्षे काही रहावं लागणार नाही. जर रहावं लागलं असतं तर राहिलो असते. दुसरं काय करणार.' सौरभला तिहारमध्ये जात असताना मनात काय भावना होती त्याबद्दल देखील बोलला.

तो म्हणाला, ज्यावेळी पुस्तक लिहिन त्यावेळी जेलचे गेट कसे होते. समोर हे दिसलं. माझ्या मनात जी प्रतिमा होती ती एकदम खूंखार होती. मात्र प्रत्यक्षात तसं नाहीये. त्यांनी जेल चांगले मेंटेन करून ठेवलं आहे. खूप जागा आहे. खूप खुली जागा असून हिरवळ आहे.

सरकारसाठी आम्ही ह्युमन बॉम्ब

मुलाखतीत सौरभ दासने त्यांच्याविरूद्ध गुन्हेगारी कटकारस्थानची केस आहे. आम्ही जंतर मंतरवर कसे गेलो. हातात झेंडा घेऊन कसे गेलो. क्राईम ब्रांच यांचा तपास करत आहे. मुलाखतकार गंमतीने म्हणाला की हे हातात झेंडा घेऊन गेले होते मात्र पाठीमागे आरडीएक्स लपवून गेले होते असं म्हटलं.

त्यावेळी दासने हसून उत्तर दिलं की, आम्ही त्यांच्यासाठी एक ह्युमन बॉम्ब सारखे आहोत. कुठंही जातो आणि फुटतो. ज्यावेळी आम्ही या आंदोलनाशी जोडलो गेलो त्यावेळी पहिल्या दिवसापासूनच आम्हाला सरकार जेलमध्ये टाकणार याची जाणीव होती. मात्र एवढे दिवस जेलमध्ये टाकतील हे वाटलं नव्हतं.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT