Cigarette Wale Baba video Pudhari
राष्ट्रीय

Cigarette Wale Baba video: ‘सिगारेट वाले बाबा’चा संतापजनक व्हिडिओ; अल्पवयीन मुलाच्या धूम्रपानावरून सोशल मीडियावर खळबळ

Cigarette Wale Baba Viral Video: गुजरातमध्ये अल्पवयीन मुलगा सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गर्दीतील लोक त्याला थांबवण्याऐवजी प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Cigarette Wale Baba Viral Video: गुजरातमधील मोरबी येथे घडलेला एक धक्कादायक प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘सिगारेट वाले बाबा’ या नावाने पसरत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक अल्पवयीन मुलगा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, आजूबाजूला उभे असलेले लोक त्याला थांबवण्याऐवजी त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

व्हिडिओच्या सुरुवातीलाच हा मुलगा लोकांच्या गर्दीत बसलेला दिसत आहे आणि तो शांतपणे सिगारेट ओढत आहे. त्याच्याभोवती मोठी गर्दी जमलेली आहे. काही जण त्याच्याकडे पाहत राहतात, तर काही लोक त्याच्यावर पैसे टाकताना देखील दिसत आहेत. या सगळ्या प्रकाराकडे अनेक जण एखाद्या ‘शो’प्रमाणे पाहत असल्याचं चित्र आहे.

यानंतर एक व्यक्ती पुढे येते आणि त्या मुलाला आणखी एक सिगारेट देते. मुलगा ती लगेच घेतो आणि काही क्षणांत तो एकाच वेळी दोन सिगारेट ओढताना दिसतो. हे पाहून अनेकजण हादरले आहेत. तरीही, गर्दीतून कुणीही त्याला थांबवण्याचा किंवा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही.

गर्दीत काही लोक शांतपणे बघत उभे आहेत, तर काही जण जवळ येऊन हा प्रकार पाहण्याचा प्रयत्न करतात. संपूर्ण वातावरणात कुठेही जबाबदारीची जाणीव दिसून येत नाही. शेवटी, व्हिडिओच्या अखेरीस एक व्यक्ती त्या मुलाच्या हातातून सिगारेट काढून घेताना दिसत आहे, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात लोक त्याच्या भोवती जमलेले दिसत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. काहींनी हा प्रकार अत्यंत असंवेदनशील आणि लाजिरवाणा असल्याचं म्हटलं आहे. “ही मूर्खपणाची परिसीमा आहे,” असे एका युजरने लिहिले, तर दुसऱ्याने लिहिलं की, “हा मुलगा अल्पवयीन आहे, हे खूप चिंताजनक आहे.”

काहींनी तर व्यंगात्मक प्रतिक्रिया देत या प्रकारावर टीका केली. “हे पैसे तो कॅन्सरच्या उपचारासाठी वापरेल,” अशी टिप्पणी एका युजरने केली. आणखी एका युजरने मुलाच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत “त्याचे पाय थरथरत आहेत,” असे लिहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT