China Nuclear Test pudhari photo
राष्ट्रीय

China Nuclear Test: गलवान संघर्षानंतर ७ दिवसात चीननं केली गुप्त न्यूक्लिअर टेस्ट... धोकादायक प्रकारचं होतं परिक्षण अन् ते कसं लपवलं?

जून २०२० मध्ये चीननं एक गुप्त अणुचाचणी केली. त्यांनी अधिक शक्तीशाली विद्ध्वंस करणाऱ्या बॉम्बचं परिक्षण केल्याचा अमेरिकेने दावा केला आहे.

Anirudha Sankpal

China Nuclear Test After Galwan: जून २०२० मध्ये चीनने एका गुप्त न्यूक्लअर टेस्ट केली होती. विशेष म्हणजे चीनने ही गुप्त अणुचाचणी २२ जून २०२० मध्ये केली होती. त्यावेळी चीनचा भारतासोबत गलवान खोऱ्यात संघर्ष सुरू होता. हा संघर्ष १५ जून रोजी सुरू झाला होता. अमेरिकेने हा दवा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार चीनने कमीत कमी एक यील्ड प्रोड्युसिंग न्यूक्लिअर टेस्ट केली होती. यावर बंदी घालण्यात आली आहे. मध्यंतरी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि रशियाचे उदाहरण देत अमेरिका देखील न्यूक्लिअर शस्त्रांची चाचणी करणार अशी घोषणा केली होती.

कोणी केला हा दावा?

अमेरिकेचे अधिकारी रशियासोबत नवा START करार यशस्वी करण्यासाठी एक नवी न्यूक्लिअर शस्त्रे नियंत्रण करार करण्याची मागणी करत आहेत. याचदरम्यान चीनवर नव्याने न्यूक्लिअर चाचणी करण्याचे आरोप होत आहेत. या नव्या नियंत्रण करारात चीनला देखील सामील करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अमेरिकेचे शस्त्र नियंत्रण आणि आंतरराष्ट्री सुरक्षाचे विदेश उप सचिव थॉमस डिनानो यांनी स्वित्झर्लंडमधील जिनेवा निःशस्त्रीकरण संमेलनात भाषण करताना म्हणाले की, 'अमेरिकेच्या सरकारला माहिती आहे की चीनने न्यूक्लिअर टेस्ट केली आहे. यात शेकडो टन यील्डच्या परिक्षणाची तयारी देखील सामील आहे.'

अमेरिकेचा आरोप काय?

डिनानो यांनी सांगितलं की, 'पीपल्स लिबरेशन आर्मीने न्यूक्लिअर स्फोट लपवून आपली अणुचाचणी लपवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना माहिती होतं की हे परिक्षण प्रतिबंधित कराराचे उल्लंघन करत आहे.' अमेरिकेच्या म्हणण्यानुसार चीनने अणुचाचणी कराराचे उल्लंघन केलं आहे.

चीनने कॉम्प्रिहेन्सिव न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रीटी (CTBT) वर स्वाक्षरी केली आहे. अमेरिका आणि चीन यांनी यील्ड - प्रोड्युसिंग व्युक्लिअर टेस्टिंगवर स्वतःच स्वतःवर बंदी घालून घेतली आहे. CTBT हे सब क्रिटिकल टेस्टिंगवर बंदी घालत नाहीत. यात पूर्णपणे न्युक्लिअर रिअॅक्शन समाविष्ट नसते.

कशी लपवली टेस्ट?

चीनने मान्य केलेली शेवटची क्रिटिकल लेवल न्यूक्लिअर टेस्ट ही १९९६ मध्ये केली होती. तर अमेरिकेने हीच चाचणी शेवटची १९९२ मध्ये केली होती.

अमेरिकेचे अधिकारी डिनानो यांनी सांगितलं की, 'चीनने आपली ही न्यूक्लिअर टेस्ट जगापासून लपवण्यासाठी डीकपलिंग या भूकंप निरीक्षणचा प्रभाव कमी करण्याचा एक पर्यायाचा वापर केला होता. त्यांनी सांगितलं की चीनने २२ जून २०२० मध्ये अशाच प्रकारची एका यील्ड प्रोड्युसिंग न्यूक्लिअर टेस्ट केली होती.

CTBT हे जगभरातील शेकडो भूकंप निरीक्षण स्थानकावरून कोणता देश न्यूक्लिअर टेस्ट तर करत नाही ना याच्यावर नजर ठेवते. २००० नंतर न्यूक्लिअर चाचणी करणारा उत्तर कोरिया हा एकमात्र देश होता. मात्र आता जर अमेरिकेचा दावा खरा ठरला तर असं करणारा चीन हा दुसरा देश होणार आहे.

yield-producing अणूचाचणी म्हणजे काय?

या प्रकारच्या न्यूक्लिअर टेस्टमध्ये अणूस्फोटानंतर उर्जा बाहेर फेकली जाते. yield चा अर्थ या स्फोटानंतर किती विस्फोटक उर्जा निर्माण झाली. सहसा ही yield किलोटन किंवा मेगाटनमध्ये मोजली जाते. समजा जर अशा कोणत्याही चाचणीचा यील्ड १५ किलोटन असेल तर याचा अर्थ एक छोट्या बॉम्बमध्ये १५००० TNT च्या समान शक्ती असते.

अशा प्रकारच्या न्यूक्लिअर टेस्टमध्ये न्यूक्लिअर सामुग्रीचा वापर केला जातो. मात्र याला अशा प्रकारे डिझाईन केलेलं असतं की यातून कोणताही न्यूक्लिअर स्फोट होऊ नये. म्हणजे ज्यावेळी चाचणी होते. त्यावळी मशरूमसारख्या आकाराचा आगीचा गोळा तयार होत नाही. यासाठीच त्याला झिरो डील्ड म्हटलं जातं.

अशा प्रकारच्या चाचणीचा उद्येश हा बॉम्ब डिझाईन केल्याप्रमाणे काम करतो की नाही. हे न्यूक्लिअर बॉम्ब हे नव्या प्रकारचे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत. हे आकाराने लहान असतात. मात्र याची क्षमता पूर्ण न्यूक्लिअर शस्त्रापेक्षा शेकडो पट जास्त असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT