Chennai road rage bar dancer killed: चेन्नईमधील एका खासगी बार मध्ये तरूणांच्या दोन गटामध्ये तुफाण राडा झाला. हा राडा बारनंतर रस्त्यावर पोहचला. मात्र ज्यावेळी एका तरूणांच्या ग्रुपने गाडी टू व्हिलरवर चढवली. यात एका १८ वर्षाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बालामुर्गन (वय २१), जोशुओ (वय १९) आणि किशोर कुमार (वय १९) यांना अटक केली. मृत झालेल्या मुलीचे नाव यांन्सी असं असून ती श्रीलंकन विस्थापित होती. ती विल्लूपरूम जिल्ह्यात रहात होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यान्सी आणि तिचे मित्र एका खासगी बारमध्ये डान्स करतात. ज्यावेळी त्यांचा ग्रुप आणि दुसऱ्या पुरूषांच्या ग्रुमध्ये वाद झाला त्यावेळी बारमधील बाऊन्सर्सनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मात्र बारच्या बाहेर हा वाद पुन्हा सुरू झाला. बाऊन्सर्सनी पुन्हा एकदा मध्यस्थी करत दोन्ही ग्रुप्सना बार सोडण्यास सांगितलं. त्यानंतर यान्सी आणि तिचे मित्र टू व्हिलरवरून जात होते. त्यावेळी विरोधी ग्रुपने कार त्यांच्यावर चढवली.
पोलिसांनी सांगितलं की यान्सीच्या मित्रांनी कारवर दगडफेक केली होती. त्यानंतर या कारने पाठलाग करून त्या टू व्हिलरला चिरडले. यात यान्सीचा जागीच मृत्यू झाला. यान्सीचा १७ वर्षाची मैत्रिण गंभीर जखमी झाली आहे. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, यान्सीच्या कुटुंबियांनी आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी खासगी बार सील केला असून या बारमध्ये १८ वर्षाच्या आतील तरूणांना प्रवेश दिल्याचा ठपका या बारवर ठेवण्यात आला आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे. या घटनेनंतर फरार झालेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.