Chatra Mob Lynching  pudhari
राष्ट्रीय

Chatra Mob Lynching: भल्या पहाटे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून दुष्कर्म केल्याचा आरोप; जमावाकडून आरोपीची हत्या; गावात प्रचंड तणाव

Anirudha Sankpal

chatra jharkhand mob lynching: चतरा जिल्ह्यातील टंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मंगळवारी अनुसूचित जातीच्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर कुष्कर्म करण्यात आले होते. त्या प्रकरणातील आरोपी युवकाला ग्रामस्थांनी घरातून बाहेर खेचत आणलं अन् त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्या आरोपी तरूणाचा मृत्यू झाला.

यावेळी या आरोपी तरूणाच्या आई-वडिलांना देखील मारहाण करण्यात आली आहे. त्यात ते जखमी झाले आहेत. अल्पवयीन मुलगी आणि आरोपी युवक हे वेगवेगळ्या समुदायाचे होते. त्यामुळं गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. खबरदारी म्हणून पोलीसांनी गावात कँम्प सेट केला आहे. पोलीस अधीक्षक नैथानी यांनी परिस्थिती हळू हळू सामान्य होत असल्याचं सांगितलं.

अल्पवयीन मुलीच्या वडिलांची तक्रार

पोलिसांनी दोषींवर कडक करावाई केली जाईल असं सांगितलं. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी तरूणाविरूद्ध अपहरण आणि शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत युवकाच्या वडिलांनी अजून पर्यंत हत्येबाबतची लिखीत तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार मिळाल्यावर आरोपींना अटक करण्याची मोहीम सुरू करण्यात येईल असं सांगितलं.

प्राथमिक माहितीनुसार, अल्पवयी मुलगी सोमवारी रात्री शौचालयासाठी घरातून बाहेर पडली होती. यावेळी सुल्तान अन्सारी यांचा मुलगा इमरोज अन्सालीने या मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत दुष्कर्म केल्याचा आरोप करण्यात आला. मंगळवारी सकाळी अल्पवयीन मुलगी आरोपी इमरोजच्या तावडीतून सुटली आणि घरी पोहचून घरच्यांना तिने सर्व घटनाक्रम सांगितला.

ग्रामस्थ चिडले अन् अन्सारीला घरातून बाहेर काढलं

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थ चिडले आणि त्यांनी इमरोज अन्सारीला घरातून बाहेर काढून बेदम मारहाण केली. यावेळी त्याच्या आई वडिलांसोबत देखील मारहाण करण्यात आली. त्यांचे हात - पाय दोरीने बांधण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच टंडवा पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र चिडलेल्या जमावावर त्यांना नियंत्रण मिळवता आले नाही.

नंतर पोलिसांनी युवकाला जमावाच्या तावडीतून सोडवलं आणि उपचारासाठी त्याला सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. तिथून त्याला हजारीबाग मधील रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

स्थानिक लोक या घटनेला प्रेम प्रकरणाशी देखील जोडून पाहत आहेत. दावा केला जात आहे की या दोघांमध्ये पहिल्यापासून प्रेम संबंध होते. तरूणाला अल्पवयीन मुलीच्या घरातून बाहेर काढून त्याला मारहाण करण्यात आली असा देखील दावा केला जात आहे. पोलीसांनी प्रेम संबंधाबाबत अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही.

गावात तणाव

या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून पोलीस अधीक्षक अनिमेष मैथानी यांनी तत्काळ अतिरिक्त पोलीस बळ मागवून घटनास्थळी कँप करण्याचे आदेश दिले. पोलीस गावात गस्त घालत असून परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहेत. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.

पोलिसांच्या समोरच मारहाण

घटना ज्यावेळी घडली त्यावेळी पोलीस घटनास्थळी उपस्थित होती. जमाव फारच आक्रमक झाला होता. त्याने आऱोपी युवकाला फरफटत आणून मारहाण केली. पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव जास्तच आक्रमक होता. त्यामुळं पोलीस हतबल झाले. युवकाला रस्त्यावरून फरफटत नेत लाकडी काठ्या आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.

पोलिसांनी व्हिडिओ फुटेज आणि इतर साक्षी पुराव्यांच्या आधारावर हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. दोषींवर हत्येसह इतर गंभीर गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT