Champat Rai Ayodhya Temple Controversy: अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी ट्रस्टचे माजी महासचिव चंपत राय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे अजून एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. चंपत राय यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवरूनच रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात रामजानकी मंदिरचे महंत संत दास उर्फ राजेश सिंह मानव यांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या आणि जमीन घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी आणि आंदोलन देखील केलं.
यापूर्वी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह आणि धर्मसेना प्रमुख संतोष दुबे यांनी एपआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांकडे मागणी केली होती.
एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीचा हवाला देत संत दास यांनी चंपत राय यांच्यावर आरोप केले आहेत. या व्हिडिओ चंपत राय हे आपल्याला रामराज्य नको आहे. भगवान राम आपल्या भावाचे झाले नाहीत तर ते आपले कसे होणार असं म्हणताना दिसत आहेत.
यावरून दास यांनी चंपत राय हे रामद्रोही आणि रामराज्याशी घृणा करणारे आहेत. दास यांनी अनेक लोकांची घरे पाडण्यात आली आणि त्यांना एक रूपया देखील नुकसान भरपाई देण्यात आली नाही असा देखील आरोप केला. चंपत राय यांनी वक्फ आणि सोसायटीची जमीन खरेदी केली आहे. या घोटाळ्यांचा गांभिऱ्याने आणि निष्पक्षतेने तपास झाला पाहिजे अशी मागणी संत दास यांनी केली.
मुलाखीतीच्या एका व्हिडिओत चंपत राय हे रामराज्य खूप अवघड आहे. रामराज्य आणण्याबाबत मी खूप घाबरतो. रामने आपल्या भावाला देखील सोडलं नाही. त्यामुळं मी रामराज्याची कल्पना करत नाहीये. जे रामराज्याची कल्पना करत आहेत ते करूदेत.
मात्र अयोध्येत लाखो लोक येतील ही कल्पना आम्ही करत आहोत. ते रस्ते, विमान आणि ट्रेनने येणार. त्यामुळं रस्ते रूंद, रेल्वे ट्रॅक मोठे, लांब प्लॅटफॉर्म, थांबण्यासाठीचे स्थान कसे असले पाहिजे, अयोध्येत साफ सफाई असावी याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागणार आहे. हा व्हिडिओ तीन ते चार वर्षापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीला आतापर्यंतच्या तपासाचा स्टेटस रिपोर्ट देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता तपासाला गती आणि वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर फायनल रिपोर्टमध्ये तपासात सामील असलेल्या ट्रस्टींवर देखील गुन्हा दाखल होण्याची टांगती तलवार लटकत आहे.
एसआयटीची स्थापना झाल्यानंतर शासनाने त्यांना प्राथमिक अहवाल हा ७ दिवसात तर अंतिम अहवाल हा १५ दिवसात देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तपासाच्या प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली. तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे राम मंदिर परिसरातील व्यवस्थेतील असलेल्या गंभीर तृटी समोर येत आहेत. यावेळी विरोधी पक्षांनी जमीन घोटाळ्याचा मुद्दा देखील केंद्रस्थानी आणला आहे.
आता दान चोरीपाठापोठ राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टने आतापर्यंत खरेदी केलेल्या जमीनींचे व्यवहार देखील रडारवर आले आहेत. यात देखील अनियमितता होती असं सांगण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रस्टद्वारे खरेदी केलेल्या काही जमिनींचे व्यवहार योग्य मानले जाऊ शकत नाहीत.