केंद्र सरकार मराठी भाषेतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार Pudhari Photo
राष्ट्रीय

Respond to Marathi Letters in Marathi: केंद्र सरकार मराठी भाषेतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार, गृहमंत्रालयाचा निर्णय

राजभाषा विभागाअंतर्गत भारतीय भाषा अनुभाग स्थापन : प्रादेषिक भाषांना बळकटी देण्याचे केंद्र शासनाचे प्रयत्‍न

Namdev Gharal

The central government will reply to letters in Marathi only, the decision of the Union Home Ministry

नवी दिल्ली : केंद्र सरकार मराठी भाषेतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने कामकाजात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राजभाषा विभागाअंतर्गत भारतीय भाषा अनुभाग स्थापन केला आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ६ जून रोजी भारतीय भाषा अनुभागाचे उद्घाटन झाले. प्रशासनाला परदेशी भाषांच्या प्रभावापासून मुक्त करण्याच्या दिशेने हा महत्वाचा टप्पा ठरेल, असे यावेळी ते म्हणाले होते.

आपल्या विचारांची, विश्लेषणाची आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया मातृभाषेत असेल, तरच आपल्या क्षमतेचा पूर्ण उपयोग होऊ शकतो, असे अमित शाह उद्घाटन कार्यक्रमात बोलले होते. या निर्णयामुळे मराठी, तामिळ आणि इतर भारतीय भाषांना बळकटी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विविध राज्यांतून स्थानिक भाषेतून येणाऱ्या पत्रांना त्याच भाषेत उत्तर दिले जाणार आहे.

दरम्यान, संसदीय राजभाषा समितीच्या ९ सदस्यांनी खासदार डॉ. दिनेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. केंद्रीय गृह मंत्रालयातील संपूर्ण कामकाज आज हिंदी भाषेत होत असून यानंतर मराठी भाषेतील पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देण्यात येईल, तामिळ भाषेतील पत्रांना तामिळ भाषेतूनच उत्तर दिले जाईल, असे डॉ. शर्मा यांनी यावेळी सांगितले. देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे आणि हिंदी भाषेला ‘सहयोगी भाषा’ म्हणून प्रस्थापित करणे या उद्देशाने समिती काम करीत असल्याचे खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT