राष्ट्रीय

जम्मू काश्मीर गझनवी फोर्सवर केंद्र सरकारची बंदी

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्यांना मदत करणे, अंमली पदार्थ तसेच शस्त्रांची तस्करी तसेच दहशतवादी कृत्यांमध्ये सामील असलेल्या जम्मू काश्मीर गझनवी फोर्स नावाच्या संघटनेवर केंद्र सरकारने शुक्रवारी बंदी घातली.

लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आदी कुख्यात दहशतवादी संघटनांत कार्यरत असलेल्या काही दहशतवाद्यांनी एकत्र येऊन गझनवी फोर्स तयार केला होता. जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या सैनिकांना वारंवार धमक्या देण्यामागे या संघटनेचा हात असल्याचे उघड झाले होते. भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या मोहिमेत जम्मू काश्मीरच्या लोकांनी सामील व्हावे, असे सांगत प्रचारासाठी गझनवी फोर्सने सोशल मीडियाचा अवलंब चालविला होता.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT