राष्ट्रीय

‘राष्ट्रगीत’, ‘वंदे मातरम’चा नागरिकांनी समान सन्मान करावा : केंद्राचे दिल्ली उच्‍च न्‍यायालयात उत्तर

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  'जन गण मन' आणि  'वंदे मातरम'च्या समान प्रचारासाठी एक धोरण बनवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात शनिवारी केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम' एक समान आहे, असे उत्तर केंद्राने न्यायालयात सादर करीत नागरिकांनी दोघांचाही समान सन्मान करण्याचे आवाहन केले आहे.

वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे कार्यकारिणी न्यायाधीश विपीन सांघी तसेच न्यायामूर्ती सचिन दत्त यांच्या खंडपीठाने केंद्राला नोटीस बजावले होते. न्यायालायने राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) देखील नोटीस बजावत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत

.शाळा तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये दररोज 'जन गण मन'तसेच 'वंदे मातरम' गायले जावे असे निर्देश केंद्र आणि दिल्ली सरकार ला देण्याची विनंती याचिकेतून करण्यात आली होती. वंदे मातरम च्या सन्मानार्थ कुठलेही दिशानिर्देश नसल्याने तसेच नियमांच्या अभावी राष्ट्रगाण असभ्य पद्धतीने गायले जात आहे. चित्रपट आणि विविध पार्ट्यामधे त्याचा दुरुपयोग केला जात असल्याचा युक्तिवाद यापूर्वीच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याकडून करण्यात आला होता.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT