नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
सीबीआय मला बदनाम करत आहे, मी आणि सिसोदिया आम्ही दोघेही निर्दोष आहोत. कोर्टात स्व:त केजरीवाल एक मिनिट बोलत होते. केजरीवाल यांच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान अरविंद केजरीवाल स्वतः उभे राहिले आणि म्हणाले की, सीबीआयकडून मीडियामध्ये असं सांगितलं जात आहे की, मी संपूर्ण दोष मनीष सिसोदिया यांच्यावर टाकला आहे. मी असे कोणतेही विधान दिलेले नाही. मी म्हणालो- मीही निर्दोष आहे... मनीष सिसोदियाही निर्दोष आहेत.
सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी औपचारिकपणे अटक केली आहे. यानंतर राऊज एव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी सुमारे 1 मिनिट आपली बाजू मांडली. यादरम्यान त्यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगितले. त्याचवेळी केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना 20 जून 2024 रोजी कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, आता सीबीआयला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची काय गरज आहे? ते का वाट पाहत होते? सीबीआय त्यांच्याकडे साहित्य असल्याचे सांगत आहे, मग त्यांनी आधी अरविंद केजरीवाल यांना का अटक केली नाही?
अरविंद केजरीवाल स्वत: उभे राहिले आणि म्हणाले की, सीबीआय मीडियामध्ये असा सांगत आहे की, मी संपूर्ण दोष मनीष सिसोदिया यांच्यावर टाकला आहे. मी असे कोणतेही विधान दिलेले नाही. मी म्हणालो- मीही निर्दोष आहे... मनीष सिसोदियाही निर्दोष आहेत. आता त्यांना अटक केली आहे, पुढील तीन-चार दिवस ते अशाच बातम्या पेरणार आहेत. ही गोष्ट प्रसारमाध्यमांमध्ये कशी पेरली जाते आणि बदनामी केली जाते हेही रेकॉर्डवर घेतले पाहिजे. आम आदमी पक्षही निर्दोष आहे, असे मला म्हणायचे आहे.