DSP Kalpana Verma  Pudhari
राष्ट्रीय

Crime News: DSP कांडने सगळेच हादरले, महिला पोलीस अधिकाऱ्यावर 'लव्ह ट्रॅप'चा आरोप, कोण आहे कल्पना वर्मा?

DSP Kalpana Verma: छत्तीसगडमध्ये DSP कल्पना वर्मा आणि व्यापारी दीपक टंडन यांच्या कथित ‘लव्ह ट्रॅप’ प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. व्यापाऱ्याने चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ दाखवत लाखो-कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

Rahul Shelke

DSP Kalpana Verma Love Trap Extortion Case Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये महिला DSP आणि स्थानिक व्यापाऱ्याच्या ‘लव्ह ट्रॅप’ प्रकरणाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. DSP कल्पना वर्मा यांच्यावर हॉटेल व्यवसायिक दीपक टंडन यांनी प्रेमसंबंधांचा वापर करून पैसे, दागिने आणि महागडे गिफ्ट्स उकळल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात व्यापाऱ्याने वॉट्सअॅप चॅट्स, फोटो आणि व्हिडिओसह अनेक पुरावे सार्वजनिक केले असून राज्यभरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

हे प्रकरण 2021 पासून सुरू असल्याचा व्यापाऱ्याचा दावा

दीपक टंडन यांचे म्हणणे आहे की, त्यांची आणि कल्पना वर्मांची ओळख 2021 मध्ये झाली. ओळख हळूहळू मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमसंबंधात बदलली. त्यांच्या आरोपानुसार, या काळात DSPने अनेक वेळा पैशांची मागणी केली आणि त्यांनी ती पूर्णही केली.

टंडन यांनी दावा केला आहे की, त्यांनी महागड्या डायमंड रिंग, गोल्ड चेन दिल्या आहेत. हॉटेलमध्ये त्यांच्या गुपचूप भेटी होत होत्या. या सोबतचं व्हिडिओ कॉलवर तासंतास बोलणं होत असे.

चॅट्समध्ये ‘डायव्होर्स’, ‘हॉटेल बुकिंग’चे उल्लेख

वायरल चॅट्समध्ये टंडन यांनी घटस्फोट घेण्याचा उल्लेख केला असल्याचे दिसत आहे आणि यावर DSPचे उत्तर आहे आहे की, “डायव्होर्स घेऊ शकता, पण माझं नाव कुठेही येता कामा नये.”

हॉटेल रुम बुकिंग, भेटींचे ठिकाण, पार्टीचे फोटो यांचेही स्क्रीनशॉट्स त्यांनी पुराव्यांमध्ये दिले आहेत. तसेच, व्यापाऱ्याच्या पत्नीच्या नावावर असलेली एक कारही DSPने वापरली असल्याचा दावा केला आहे.

फोटो–व्हिडिओमुळे प्रकरण आणखी वाढले

व्यापाऱ्याने मीडिया समोर जे फोटो-व्हिडिओ ठेवले, त्यात दोघे एकत्र दिसत असल्याचे समोर आले आहे. लग्न समारंभातील फुटेज, हॉटेल लॉबीतील फोटो आणि व्हिडिओ कॉल्सचे स्क्रीनशॉट्सही त्यांनी दिले आहेत. टंडन यांनी सांगितले की, “हे एकतर्फी प्रेम नव्हतं, तर ही फसवणूक होती.” त्यांनी पोलिस तक्रार दाखल केली, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

DSP कल्पना वर्मांनी आरोप नाकारले

DSP कल्पना वर्मांनी या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, व्हायरल चॅट्स खोटे आहेत. "दीपक टंडनचा माझ्या वडिलांशी न्यायालयात अनेक महिन्यांपासून आर्थिक वाद सुरू आहे. हे सर्व माझी बदनामी करण्यासाठी चालू आहे. मी मानहानीचा खटला दाखल करेन आणि कायदेशीर कारवाई करेन," असे त्या म्हणाल्या.

राजकीय आणि पोलिस वर्तुळातही चर्चा

कल्पना वर्मा या 30 वर्षांच्या असून छत्तीसगड पोलिसमध्ये त्या डीएसपी पदावर आहेत. त्या त्यांच्या कडक कारवाईमुळे चर्चेत असतात. त्या सध्या दंतेवाडा येथे तैनात आहेत. त्या पूर्वी एटीएस (दहशतवादविरोधी पथक) मध्ये डीएसपी म्हणून काम करत होत्या.

यापूर्वी, काँग्रेस सरकारच्या काळात, एका व्हायरल फोटोमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. सध्याचे गृहमंत्री विजय शर्मा आणि भाजप नेते निवेदन सादर करण्यासाठी ऑफिसमध्ये आले तेव्हा कल्पना मोबाईल फोनवर व्यस्त असल्याचे दिसून आले होते. DSP कल्पना वर्मा अनेकदा वादात सापडल्या आहेत. यामुळे हे प्रकरण जास्तच चर्चेत आहे. आता प्रश्न असा आहे की, हा खरोखर लव्ह ट्रॅप होता की आर्थिक वाद होता? याचे उत्तर पोलीस तपासातूनच मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT