Bpsc Teacher Tragic End: एका सरकारी शाळेतील महिला शिक्षिकेने आपले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले असून तिचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला आहे. महिला शिक्षिकेनं, 'मम्मी पापा सॉरी! माझा कोणाशाही वाद नाही. ही हत्या नाही. मी प्रिया भारती आपल्या आजापणामुळं माझं जीवन संपवत आहे. यात कोणत्याही व्यक्तीचा हात नाही. माझे पार्थिव रसलपूर घेऊन जाऊ नये. माझा अंत्यविधी हा हाजीपूरमध्ये केला जावा.' अशी नोट लिहून ठेवली.
याचबरोबर प्रिया भारती यांनी 'त्यांना मुखाग्नी हा त्यांच्या पतीने नाही तर त्यांच्या मुलगीने द्यावा अशी इच्छा देखील हिलून ठेवली आहे. मोबाईलच्या नोट्समध्ये काही मॅसेज, आणि ऑडिओ, व्हिडिओ आहेत. त्याचा पासवर्ड हा माझ्या पतीला माहिती आहे. मी त्याचे देखील मन दुखावले आहे. मी सर्वांची माफी मागते.
पोलिसांना विनंती आहे की माझे शवविच्छेदन करण्यात येऊ नये. माझे पती किंवा कुटुंबावर कोणताही गुन्हा दाखल केला जाऊ नये. मी हा पाऊल वैयक्तिकरित्या उचललं आहे. भाई जी तुमची मुलगी हरली सॉरी मम्मी; साडे पाच लीटर दूधाचे पैसे द्यायचे आहेत. माझ्या पर्समधील पैसे आहेत ते द्या.' अशा अनेक गोष्टी प्रिया यांनी आपल्या नोटमध्ये लिहिल्या होत्या.
दरम्यान, शिक्षिकेच्या कुटुंबियांनी ही हत्या असल्याचे वक्तव्य केलं आहे. मृत प्रियाचे मामाभाऊ गुंजन कुमार यांनी प्रियाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. प्रियाचे मामा हरिकांत गिरी यांनी सांगितले की, एका आठवड्यापूर्वी कौटुंबिक वादानंतर प्रिया या आपल्या तीन महिन्याच्या मुलीला घेऊन रसूलपूरमध्ये आल्या होत्या. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आम्ही तिच्या भाड्याच्या घरात पोहचलो.
प्रियाचा मृतदेह दोरीला लटकला होता. मात्र तिचे शरीर पूर्णपणे जमिनिला टेकले होते. पाहिल्यावर ही आत्महत्या वाटत नव्हती. तिची हत्या करून आत्महत्या असल्याचं भासवलं जात आहे. जी नोट लिहिली आहे त्यातील हस्ताक्षर देखील प्रियाच्या हस्ताक्षराशी जुळत नाही.
हरिकांत गिरी म्हणाले की, 'त्यांच्या आई-वडिलांनी तिला खूप कष्टानं शिकवलं होतं. तिच्या भावाचे लग्न १५ दिवसांवर आले होते. भावाच्या लग्नात ती तिच्याकडून काही खर्च करणार होती. मात्र यावरून सासूसोबत तिचा वाद झाला होता.
२६ जानेवारी रोजी प्रियाच्या शाळेत प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू होती. यासाठी सर्व शिक्षकांना हजर रहायचे होते. मात्र प्रिया खूप वेळ झाला तरी आलीच नाही. त्यानंतर प्रियाच्या सहकाऱ्यांनी तिच्या भाड्याच्या घरात जाऊन पाहिले. त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र कोणतीच प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून आत डोकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रियाचा मृतदेह दोरखंडाला लटकलेला दिसला. यानंतर त्यांनी पोलिसांना आणि प्रियाच्या कुटुंबियांना याची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार प्रियाचे वडील दीपक कुमार रक्सौल हे ICICI बँकेत डेप्युटी ब्रांच मॅनेजर आहे. तो तीन दिवसांपूर्वी घरी आला होता. कुटुंबियांनी सांगितले की अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.