राष्ट्रीय

भाजप पंजाबमध्ये ६५ जागांवर शड्डू ठोकणार ; जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

backup backup

चंदिगड; पुढारी ऑनलाईन

पंजाबमध्ये भाजप आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस आणि सुखदेव सिंह ढिंढसा यांच्या पक्षाने सोमवारी जागावाटप जाहीर केले. भाजप सगळ्यात मोठा पक्ष असल्याने ६५ जागा लढवणार आहे. तर अमरिंदर सिंह यांचा पक्ष ३७ जागा लढवणार आहे आणि ढिंढसा यांचा पक्ष १५ जागा लढवणार आहे. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला ११७ जागांसाठी मतदान होणार असून १० मार्च रोजी निकाल जाहीर होतील.

अमरिंदर सिंग यांच्या पक्षाने एक दिवस अगोदर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पहिल्या दिवशी २२ उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारांमध्ये भारताचे माजी हॉकीपटू अजित पाल यांचाही समावेश आहे. कॅप्टन स्वत: पटियाला या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

उमेदवारांची घोषणा करत असताना कॅप्टन सिंग म्हणाले की उमेदवारांची निवडून येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना तिकिट दिले आहे. तसेच सर्व जाती-धर्मांना प्रतिनिधित्व मिळेल याचाही विचार केला आहे. जागावाटपात पंजाब लोक काँग्रेसला ज्या २६ जागा मिळाल्या आहेत. त्यातील २६ जागा मालवा क्षेत्रातील आहेत. या क्षेत्रात अमरिंदर सिंह यांच्या परिवाराचा प्रभाव आहे.

याच क्षेत्रामधून कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी २०१८७ साली काँग्रेस पक्षासाठी मोठी आघाडी मिळवली होती. ज्यामध्ये कृषी क्षेत्रात केलेल्या कामाचे मोठे योगदान होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT