BJP New Social Media Head pudhari
राष्ट्रीय

BJP New Social Media Head: भाजप सोशल मीडिया प्रमुखपदी आता दीपक म्हस्के... अमित मालवीय यांच्याकडून जबाबदारी काढून घेतली

Anirudha Sankpal

BJP New Social Media Head: भारतीय जनता पक्षाने (BJP) आपले राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांच्या नेतृत्वाखाली नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. या मोठ्या संघटनात्मक फेरबदलात सर्वात लक्षवेधी ठरलेला निर्णय म्हणजे अमित मालवीय यांच्याकडून सोशल मीडिया विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. मात्र, ते भाजपचे 'आयटी सेल' प्रमुख (National IT Incharge) म्हणून काम पाहत राहतील.

डिजिटल आणि सोशल मीडिया टीममध्ये मोठा बदल

सोशल मीडिया आणि डिजिटल ऑपरेशन्स अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाने या संरचनेत बदल केले आहेत. छत्तीसगडचे दीपक म्हस्के यांची भाजपच्या नव्या राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी चार सह-संयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे:

  • प्रीती गांधी (महाराष्ट्र)

  • शिवानंद द्विवेदी (दिल्ली)

  • आलोक भट्ट (उत्तराखंड)

  • अरुण यादव (हरियाणा)

तसेच, अनिल बलूनी यांनी राष्ट्रीय मीडिया संयोजक पद कायम ठेवले असून आशीष अग्रवाल, प्रदीप भंडारी आणि सिद्धार्थ यादव यांची सह-मीडिया संयोजक म्हणून निवड झाली आहे.

नितिन नबीन यांच्या नव्या टीममध्ये कोणाला काय जबाबदारी?

नव्या कार्यकारिणीत अनुभवी आणि तरुण चेहर्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष: नितिन नबीन

संगठन सरचिटणीस: बी. एल. संतोष

कोषाध्यक्ष: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

केंद्रीय कार्यालय प्रमुख: तरुण चुघ

उपाध्यक्ष (एकूण १३ नेते):

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, राम माधव, बैजयंत पांडा, स्मृती इराणी, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, महाराष्ट्राच्या माजी केंद्रीय मंत्री भारती पवार आणि पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल आदींचा समावेश आहे.

सरचिटणीस (एकूण ८ नेते):

महाराष्ट्रातून विनोद तावडे आणि सुनील बन्सल यांनी आपले सरचिटणीसपद कायम ठेवले आहे. याशिवाय स्मृती इराणी, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव, डॉ. सतीश पुनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांची नव्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय राष्ट्रीय सह-संगठन सरचिटणीस म्हणून शिवप्रकाश आणि सौदान सिंह काम पाहतील. नव्या टीममध्ये अनिल अँटोनी, के. सुरेंद्रन, फांगनोन कोन्याक यांसारख्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने करण्यात आलेले हे बदल तात्काळ प्रभावाने लागू झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT