BJP National Committee: BJP नवीन राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा; भारती पवारांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, गोयलांकडे तिजोरीच्या चाव्या

BJP National Committee
BJP National Committeepudhari
Published on
Updated on

BJP New National Committee Announce: भारतीय जनता पार्टीचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नवीन राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची, विविध मोर्च्यांच्या अध्यक्षांची आणि इतर प्रमुख जबाबदाऱ्यांची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्रातून विनोद तावडे, डॉ. भारती प्रवीण पवार आणि पीयूष गोयल यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असल्याचे पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि स्मृती इराणी यांच्याकडे देखील मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नवीन कार्यकारिणीत महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे महाराष्ट्रातून डॉ. भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. 

राष्ट्रीय सरचिटणीस (महामंत्री): विनोद तावडे यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची (महामंत्री) महत्त्वाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सोशल मीडिया सह-संयोजक: प्रीति गांधी यांची सोशल मीडिया सह-संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.

प्रमुख राष्ट्रीय पदाधिकारी व जबाबदाऱ्या:

१. राष्ट्रीय उपाध्यक्ष (१३ सदस्य):

वसुंधरा राजे सिंधिया (राजस्थान), तीरथ सिंह रावत (उत्तराखंड), राम माधव (दिल्ली), बैजयंत जय पांडा (ओडिशा), डॉ. पुरंदेश्वरी (आंध्र प्रदेश), रेखा वर्मा (उत्तर प्रदेश), वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी (गुजरात), डॉ. भारती प्रवीण पवार (महाराष्ट्र), सरदार मनप्रीत सिंह बादल (पंजाब), लाल सिंह आर्य (मध्य प्रदेश), प्रा. एस. नागराज (कर्नाटक), प्रा. तारिक मन्सूर (उत्तर प्रदेश), आणि डॉ. मधुचंद कर (पश्चिम बंगाल). 

१. संघटन व सरचिटणीस (महामंत्री):

राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन): बी. एल. संतोष (दिल्ली).

राष्ट्रीय सह-सरचिटणीस (संघटन): शिवप्रकाश (मुंबई) आणि सौदान सिंह (चंडीगड).

राष्ट्रीय सरचिटणीस (महामंत्री): विनोद तावडे (महाराष्ट्र), सुनील बन्सल (दिल्ली), बिप्लव कुमार देव (त्रिपुरा), स्मृती इराणी (उत्तर प्रदेश), डॉ. सतीश पूनिया (राजस्थान), गजेंद्र पटेल (मध्य प्रदेश), हरीश द्विवेदी (उत्तर प्रदेश) आणि संजय भाटिया (हरियाणा).

१. राष्ट्रीय कोषाध्यक्ष व सह-कोषाध्यक्ष:

कोषाध्यक्ष: पीयूष गोयल (महाराष्ट्र).

सह-कोषाध्यक्ष: राजेश मंगल (राजस्थान).

१. कार्यालय व इतर संयोजक:

कार्यालय प्रभारी: तरुण चुघ (पंजाब).

कार्यालय मंत्री: महेंद्र पांडे (उत्तराखंड).

नॉर्थ ईस्ट संयोजक: डॉ. संबित पात्रा (ओडिशा).

नॉर्थ ईस्ट सह-संयोजक: राजीव बब्बर (दिल्ली).

प्रकोष्ठ संकुल संयोजक: विष्णु दत्त शर्मा (मध्य प्रदेश).

प्रकोष्ठ संकुल सह-संयोजक: ऋतुराज सिन्हा (बिहार) आणि विष्णु वर्धन रेड्डी (आंध्र प्रदेश).

विभागीय व मोर्चा अध्यक्ष:

युवा मोर्चा: डॉ. हेमांग जोशी (गुजरात).

महिला मोर्चा: रूप कुमारी चौधरी (छत्तीसगड).

ओबीसी मोर्चा: अमरपाल मौर्य (उत्तर प्रदेश).

किसान मोर्चा: बन्सीलाल गुर्जर (मध्य प्रदेश).

एससी मोर्चा: शिवेश कुमार राम (बिहार).

एसटी मोर्चा: डॉ. मन्नालाल रावत (राजस्थान).

अल्पसंख्याक मोर्चा: कुंवर बासित अली (उत्तर प्रदेश).

मीडिया आणि सोशल मीडिया टीम:

मीडिया संयोजक: अनिल बलूनी (उत्तराखंड).

मीडिया सह-संयोजक: आशिष उषा अग्रवाल (मध्य प्रदेश), प्रदीप भंडारी (दिल्ली) आणि सिद्धार्थ यादव (दिल्ली).

सोशल मीडिया संयोजक: दीपक म्हस्के (छत्तीसगड).

सोशल मीडिया सह-संयोजक: प्रीति गांधी (महाराष्ट्र), शिफानन्द द्विवेदी (दिल्ली), आलोक भट्ट (उत्तराखंड) आणि अरुण यादव (हरियाणा).

ही नवी कार्यकारिणी पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news