BJP Nagpur News: पूर्व विदर्भ पदवीधर आढावा बैठकीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश

स्थिर, सक्षम आणि विकासाला गती देणारे सरकार देण्याची क्षमता भारतीय जनता पक्षात आहे
BJP
BJPPudhari
Published on
Updated on

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या पूर्व विदर्भ पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आढावा बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वासनिक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाला बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला.

BJP
Arun lakhani nagpur bjp| खा. सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी होणार भाजपचे आमदार?

पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी “स्थिर, सक्षम आणि विकासाला गती देणारे सरकार देण्याची क्षमता भारतीय जनता पक्षात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील नेतृत्वाच्या विकासाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे,” अशी भावना व्यक्त केली.

BJP
Nagpur BJP | 'जंगलराजचा अंत, जनमताचा विजय': पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयानंतर नागपुरात जल्लोष

आमदार मोहन मते यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. त्यांच्या प्रवेशामुळे दक्षिण नागपूरमधील भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढली असून आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

BJP
Nagpur BJP : विदर्भातील लोकसभेच्या १० जागा लढविण्याची भाजपची तयारी

दरम्यान, पूर्व विदर्भ पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आढावा बैठकीत मतदारांशी संपर्क, संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते आणि आमदार डॉ. राजीव पोद्दार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news