Birth Month Personality file photo
राष्ट्रीय

Birth Month Personality: लोकांना तुम्ही कसे वाटता आणि प्रत्यक्षात कसे आहात? जन्ममहिन्यानुसार जाणून घ्या तुमचा खरा स्वभाव

डॉ. नीती कौशिक यांनी प्रत्येकाच्या जन्ममहिन्यानुसार तुम्ही कसे आहात आणि लोक तुम्हाला काय समजतात किंवा तुमच्याकडे कसे पाहतात, याबाबत सांगितले आहे.

मोहन कारंडे

Birth Month Personality

नवी दिल्ली: आपण जगासमोर जसे वावरतो, तसेच आपण आतून असतो का? अनेकदा लोक आपल्याकडे पाहून एक वेगळंच मत बनवतात, पण आपल्या मनातील खरी घालमेल फक्त आपल्यालाच ठाऊक असते. प्रसिद्ध डॉ. नीती कौशिक यांनी नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रत्येकाच्या जन्ममहिन्यानुसार तुम्ही कसे आहात आणि लोक तुम्हाला काय समजतात किंवा तुमच्याकडे कसे पाहतात, याबाबत सांगितले आहे.

डॉ. नीती कौशिक यांच्या मते, लोक सहसा फक्त वरवरचा चेहरा पाहतात तुमचा आत्मविश्वास, तुमचे हास्य आणि तुमचा शांत स्वभाव. पण त्या हास्यामागे दडलेला दबाव, जपून ठेवलेल्या भावना आणि दररोज खंबीरपणे उभे राहण्यासाठी लागणारी ताकद कोणालाही दिसत नाही. त्यांनी जन्ममहिन्यानुसार व्यक्तीची बाह्य प्रतिमा आणि आतील सत्य यातील फरक स्पष्ट केला आहे. जाणून घ्या तुमचा खरा स्वभाव

१. जानेवारी

लोक तुमच्याकडे कसे पाहतात: लोक तुम्हाला एक खंबीर, जबाबदार आणि नेहमी नियंत्रणात राहणारी व्यक्ती म्हणून पाहतात.

तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात: शांतपणे दबाव सहन करणारा आणि जेव्हा तुम्हाला दडपण येते तेव्हा क्वचितच दाखवतो. जेव्हा तुम्हाला आधाराची आवश्यकता असते तेव्हाही तुम्ही शांत राहता, कारण तुम्हाला वाटते की इतर तुमच्यावर अवलंबून आहेत.

२. फेब्रुवारी

लोक तुमच्याकडे कसे पाहतात: फेब्रुवारीत जन्मलेले लोक जगाला थोडे अलिप्त, स्वतंत्र आणि भावनिकदृष्ट्या शांत वाटू शकतात.

तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात: हे लोक अतिशय विचारशील आणि संवेदनशील असतात. आपली भावनिक खोली कोणाला दाखवायची याबाबत ते खूप निवडक असतात आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी जाणूनबुजून अलिप्त राहणे पसंत करतात.

३. मार्च

लोक तुमच्याकडे कसे पाहतात: मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तींची प्रतिमा लोकांच्या नजरेत मृदू, स्वप्नळू आणि कोमल अशी असते.

तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात: हे लोक भावनिकदृष्ट्या प्रचंड बलवान आणि लवचिक असतात. त्यांनी त्यांचे दुःख शांतपणे पचवायला आणि क्षमा करून पुढे जायला शिकलेले असते.

४. एप्रिल: रागीट नव्हे तर प्रामाणिक

लोक तुमच्याकडे कसे पाहतात: एप्रिलमध्ये जन्मलेल्यांकडे लोक धाडसी, निर्भीड आणि स्पष्टवक्ते म्हणून पाहतात.

तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात: प्रत्यक्षात ते अत्यंत उत्कट आणि संरक्षक वृत्तीचे असतात. त्यांचे हृदय खूप हळवे असते. त्यांची तीव्र प्रतिक्रिया ही आक्रमकता नसून त्यांच्या मनातील प्रामाणिकपणा असतो.

५. मे: शांततेचे पुरस्कर्ते

लोक तुमच्याकडे कसे पाहतात: मे महिन्यात जन्मलेले लोक जगाला शांत, हट्टी आणि कशाचीही फिकीर नसलेले वाटू शकतात.

तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात: हे लोक प्रत्येक गोष्ट मनापासून अनुभवतात, पण त्यांना नाटकापेक्षा (Drama) आयुष्यात स्थिरता जास्त महत्त्वाची वाटते. ते गप्प राहतात याचा अर्थ त्यांना काळजी नाही असा होत नाही, तर केवळ शांतता राखण्यासाठी ते मौन पाळतात.

६. जून (June)

लोक तुमच्याकडे कसे पाहतात: तुम्ही खूप बोलके, खेळकर आणि चिंतामुक्त आहात असे लोकांना वाटते.

तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात: प्रत्यक्षात तुम्ही खूप निरीक्षणक्षम आणि विचारशील आहात. तुमच्या विनोदी स्वभावाखाली विचारांचे काहूर असते आणि हे विचार संतुलित करण्यासाठीच तुम्ही हलक्या-फुलक्या स्वभावाचा आधार घेता.

७. जुलै

लोक तुमच्याकडे कसे पाहतात: लोक तुम्हाला प्रेमळ, भावनिक आणि संवेदनशील समजतात.

तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात: तुम्ही भावनिकदृष्ट्या अतिशय खंबीर आणि सर्वांचे रक्षण करणारे आहात. जेव्हा तुम्ही स्वतःची जखम शांतपणे भरून काढत असता, तेव्हाही तुम्ही इतरांना आधार देऊन एकत्र धरून ठेवता.

८. ऑगस्ट

लोक तुमच्याकडे कसे पाहतात: लोक तुम्हाला आत्मविश्वासी, धाडसी आणि लक्ष वेधून घेणारे समजतात.

तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात: प्रत्यक्षात तुम्ही अशा व्यक्ती आहात जिला कौतुक आणि भावनिक आधाराची गरज असते. तुमचा आत्मविश्वास बाहेरून चमकतो, पण तुमचे हृदय नेहमी निखळ प्रेम आणि निष्ठेला महत्त्व देते.

९. सप्टेंबर

लोक तुमच्याकडे कसे पाहतात: लोकांना तुम्ही कामात अचूकता शोधणारे, टीका करणारे आणि थोडे अबोल वाटता.

तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात: तुम्ही मनातून खूप काळजी घेणारे आणि विचारशील आहात. तुम्हाला गोष्टी आणि माणसे सुरक्षित राहावीत आणि त्यांना आधार मिळावा असे वाटते, म्हणून तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देता.

१०. ऑक्टोबर

लोक तुमच्याकडे कसे पाहतात: लोक तुमच्याकडे एक आकर्षक, संतुलित आणि आनंदी व्यक्तिमत्व म्हणून पाहतात.

तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात: शांतता राखण्याचा प्रयत्न करताना तुम्ही मनातील द्वंद्व सहन करत असता. अनेकदा तुम्ही स्वतःच्या भावनिक गरजांपेक्षा इतरांसोबतचे सलोख्याचे संबंध जपण्याला प्राधान्य देता.

११. नोव्हेंबर

लोक तुमच्याकडे कसे पाहतात: लोकांना तुम्ही थोडे रहस्यमय, तापट स्वभावाचे आणि समजायला कठीण असे वाटता.

तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात: तुम्ही अत्यंत निष्ठावान आणि भावनिकदृष्ट्या सखोल विचार करणारे आहात. तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप तीव्रतेने अनुभवता, त्यामुळे स्वतःच्या संवेदनशीलतेचे रक्षण करण्यासाठी तुम्ही तुमचे मन सहजासहजी कोणासमोर उघड करत नाही.

१२. डिसेंबर

लोक तुमच्याकडे कसे पाहतात: लोक तुम्हाला चिंतामुक्त, धाडसी आणि खेळकर समजतात.

तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात: तुम्ही आयुष्याचा अर्थ आणि सत्याचा शोध घेणारे व्यक्ती आहात. तुमच्या स्वातंत्र्याच्या आवडीमागे प्रगती करण्याची आणि जीवनाचे उद्दिष्ट शोधण्याची तीव्र इच्छा दडलेली असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT