Weekly Horoscope: महादेवाच्या कृपेने या आठवड्यात होणार धनलाभ! पाहा तुमचे साप्ताहिक राशिभविष्य

Weekly Horoscope in Marathi: साप्ताहिक राशिभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी, 2026, जाणून घ्या तुमचा आठवडा कसा जाईल?
Weekly Horoscope
Weekly Horoscopefile photo
Published on
Updated on

Weekly Horoscope

हा सप्ताह मेष, वृषभ, कन्या, धनु राशिगटाला उत्तम, तर कर्क, वृश्चिक, मीन राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. महत्त्वाचे ग्रहयोग ः दि. 16-रवी केंद्र हर्षल, बुध त्रिकोण गुरू, दि. 20-शनी युती नेपच्यून. वक्री ग्रह ः गुरू. अस्तंगत ग्रह ः मंगळ.

मेष : अनेक प्रकारे लाभ होतील

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

र.बु.शु.रा. 11 वे. अनेक प्रकारे लाभ होतील. नवीन मित्र होतील. नोकरी, धंदा, व्यवसायात अधिकार असतील; परंतु उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. विवाह जुळेल. बदलीची शक्यता राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक मोबदला मिळेल; पण सप्ताहाच्या शेवटी विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. खर्च वाढेल.

वृषभ : धंदा, व्यवसायात भरभराट

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

र.बु.शु.रा. 10 वे. धंदा, व्यवसायात भरभराट होईल; पण अस्थिरता जाणवेल. बढतीची शक्यता राहील. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. कायमस्वरूपाची नोकरी मिळेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक कृत्ये कराल. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. सप्ताहाच्या शेवटी मोबदला मिळेल. बक्षीस मिळवाल. कौतुक होईल. लहरीपणा आवरा.

मिथुन : नावलौकिक वाढेल

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

र.बु.शु.रा. 9 वे. प्रवास घडेल. नावलौकिक वाढेल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. भाग्यकारक अनुभव येईल. धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. विवाह जुळल्यास चांगले स्थळ मिळेल. कर्णविकार जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा जाणवेल. नातेवाईकांची सरबराई करावी लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. जबाबदारीने काम करून समाधान मिळवाल.

कर्क : जमा-खर्चाचा मेळ बसणार नाही

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

र.बु.शु.रा. 8 वे. खर्च प्रमाणाबाहेर होईल. जमा-खर्चाचा मेळ बसणार नाही. भावनिक दडपण राहील. कौटुंबिक खर्च वाढेल. कायदेशीर बाबीमुळे अडचणीत याल. प्रतिष्ठा सांभाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला इतरांच्या सहकार्याने यश मिळेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनोबल कमी राहील. सप्ताहाच्या शेवटी वरिष्ठांचे दडपण राहील.

सिंह : कामासाठी प्रवास

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

र.बु.शु.रा. 7 वे. कामासाठी प्रवास घडेल. भावनिक दडपण राहील. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. गुप्त कारवायांचा त्रास संभवतो. अडचणी, त्रास, विलंब अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. इतरांच्या सहाय्याने कामात यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी शारीरिक व्याधी, सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.

कन्या : बुद्धिकौशल्याने यश

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

र.बु.शु.रा. 6 वे. थोडा स्पर्धकांचा अंदाज घ्या. यश तुमचेच राहील. भावनिक दडपण राहील. एखादी संधी चालून येईल. गुणवत्ता वाढवा. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला शैक्षणिक बाबीकडे लक्ष द्या. पुढे कामात यश मिळेल; पण कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. सप्ताहाच्या शेवटी यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील.

तूळ : मित्रांचा प्रभाव राहील

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

र.बु.शु.रा. 5 वे. मित्रांच्या विचारांचा प्रभाव तुमच्यावर राहील. शैक्षणिक परिस्थिती गोंधळाची राहील. मनाची कुचंबणा होईल. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. शत्रूवर मात कराल. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. शिक्षणातील अडचणी दूर करू शकाल. सप्ताहाच्या शेवटी कष्टाच्या मानाने कमी मोबदला मिळेल.

वृश्चिक : घरगृहस्थीची काळजी

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

र.बु.शु.रा. 4 थे. घरगृहस्थीची काळजीने मन उद्विग्न राहील. शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल. झोकून देऊन कामे कराल. सुवर्णालंकारांची प्राप्ती होईल. भावनिक दडपण राहील. खर्च वाढेल. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास इ.साठी धावपळ होईल. कामे होतील. प्रॉपर्टीच्या कामांना वेग येईल. सप्ताहाच्या शेवटी शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल.

धनु : कामात यश मिळत जाईल

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

र.बु.शु.रा. 3 रे. कामात यश मिळत जाईल. स्वत:ला सिद्ध कराल. कौटुंबिक खर्च वाढेल. विवाह जुळेल. पुरस्कार मिळतील. जामीन राहू नका. खर्च वाढेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा, समस्यांकडे लक्ष द्या. एक-दोन दिवस धावपळीचे, यश देणारे जातील. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीची कामे होतील.

मकर: कष्टाशिवाय धनप्राप्ती नाही

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

र.बु.शु.रा.2 रे. आर्थिक प्राप्ती जेमतेम व कष्टसाध्य राहील. नियोजन चांगले राहील. मित्रांची मदत होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. भावनावेग आवरा. पोटाची तक्रार जाणवेल. सप्ताहाची सुरुवात उत्साहाने होईल. वाढत्या कौटुंबिक गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी, प्रवास इ.साठी धावपळ होईल. कामे होतील.

कुंभ : रागाने बोलणे टाळा

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

र.बु.शु.रा.1 ले. रागाने उद्धट, आक्रमक बोलणे टाळा. भावनिक दडपण राहील. गुरुकृपा राहील. शैक्षणिक प्रगती होत राहील. कामात अडचणी, विलंब, त्रास अनुभवाल. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी चिडचिडीने होईल. एक-दोन दिवसांत रेंगाळलेली कामे पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक समस्या, गरजांकडे लक्ष द्या.

मीन : धंद्यात स्पर्धा जाणवेल

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

र.बु.शु.रा. 12 वे. धंद्यात स्पर्धा जाणवेल. त्रास, विलंब, अडचणी येतील; पण प्रॉपर्टीची कामे होतील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. निर्णायक कामात यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाची घटना घडेल. एक-दोन दिवस मोठे खर्चाचे जातील. कायदेशीर बाबींकडे लक्ष दद्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news