Bihar Election 2025 Results Memes: बिहार विधानसभा निवडणूक 2025चे सुरुवातीचे कल समोर येताच सोशल मीडियावर मीम्स दिसू लागले आहेत. एनडीए तब्बल 200 जागांवर आघाडी घेत असल्याचे चित्र दिसताच X (जुने ट्विटर) वर मीम्सचा पाऊस पडत आहे.
सर्वात जास्त व्हायरल झालेल्या मीम्सपैकी एक होता, "नेहरूजी त्यांच्या वाढदिवशी काँग्रेसचा परफॉर्मन्स पाहताना..." 14 नोव्हेंबर हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन. आणि त्याच दिवशी काँग्रेसचा पराभव झाला हे दाखवणारे मीम वायरल झाले आहे.
जन सुराज पक्षाच्या पीके म्हणजेच प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती. पण सुरुवातीच्या कलांमध्ये JSP एकाही जागेवर आघाडीवर नसल्याने मीम मेकर्स सक्रिय झाले.
एका मीम असं होतं "बहुत पीछे रह गया न मैं?" तर दुसऱ्या मीममध्ये "नीचे से देख, कुछ दिख रहा है क्या?" जन सुराजला 0–5 जागा मिळू शकतात, असा अंदाज एक्झिट पोल्सनी दिला होता आणि तेच चित्र दिसू लागल्याने मीम्सचा पूर आला आहे.
महाआघाडीचा चेहरा असलेले तेजस्वी यादवही मीममेकर्सच्या निशाण्यावर आहेत. एका मीममध्ये ते म्हणताना दाखवले "आमची मुख्यमंत्री होण्याची वेळ आली आणि एक्झिट पोलच बरोबर ठरलं!" महाआघाडी अनेक जागांवर मागे पडल्यानंतर हे मीम सोशल मीडियावर प्रचंड शेअर झाले आहे.
निवडणूक वातावरणात सोशल मीडिया हा लोकांच्या भावनेचा आरसा आहे. एनडीएच्या आघाडीमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ सुरु आहे. थोडक्यात, बिहारचा राजकीय मूड जाणून घ्यायचा असेल तर आज X वरचे मीम्स पाहणंच पुरेसं आहे.