प्रातिनिधिक छायाचित्र.  pudhari
राष्ट्रीय

crime news |भयंकर... 'वेस्टर्न स्टाईल' प्रपोज करण्याच्या बहाण्याने प्रियकराला खुर्चीला बांधले आणि जिवंत जाळले!

Fake proposal murder case | बंगळुरूमधील तरुणीचे कृत्‍याने पोलीसही हादरले

पुढारी वृत्तसेवा

Fake proposal murder case

बंगळूरु : येथील एका २७ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीने घरात हात-पाय बांधून जिवंत जाळून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज (दि. २१)दुपारी घडली. हा खून पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

'वेस्टर्न स्टाईल' प्रपोज करण्याच्या बहाणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण नावाचा तरुण अंजनानगर येथे राहणार्‍या प्रेयसीच्या घरी गेला. त्यावेळी घरात दुसरे कोणीही नव्हते. प्रेमाने किरणला सांगितले की, तिला त्याला "वेस्टर्न स्टाईल" (पाश्चात्य पद्धत) ने प्रपोज करायचे आहे. जोडीदार गुडघ्यावर बसून प्रेम व्यक्त करतो. या बहाण्याने तिने किरणचे हात-पाय दोरीने बांधले आणि त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. जेव्हा किरणने यावर प्रश्न विचारला, तेव्हा तिने हा प्रपोज करण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग असल्याचे सांगून त्याला शांत केले.

अंगावर रॉकेल ओतून पेटवले

तपासादरम्यान समोर आले की, प्रेमाने किरणचे हात-पाय दोरीने बांधले आणि त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली असहाय्य स्थितीत असताना प्रेमाने त्याच्या अंगावर रॉकेल ओतले आणि त्याला आग लावून दिली. गंभीररीत्या भाजल्यामुळे किरणचा जागीच मृत्यू झाला.

संपूर्ण घटनेचे केले मोबाईलमध्‍ये चित्रीकरण

पोलिसांनी घटनास्थळावरून रॉकेल जप्त केले असून, हे कृत्य करण्यासाठी तिने आधीच तयारी केली होती, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने या संपूर्ण घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा दावाही केला जात असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

प्रेमसंबंधातून टोकाचे पाऊल

किरण आणि प्रेमा (दोघांचे वय २७ वर्षे) हे राजाजीनगरमधील 'Vi' (व्होडाफोन-आयडिया) स्टोअरमध्ये एकत्र काम करत होते. तिथेच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात तणाव होता. किरण आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा राग प्रेमाच्या मनात होता, असे तपासात समोर आले आहे."आम्ही महिलेला ताब्यात घेतले असून चौकशीअंती तिनेच तरुणाला पेटवून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. ते दोघे नात्यात होते आणि तो आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून तिने हे कृत्य केले," असे पोलीस उपायुक्त (उत्तर-पश्चिम) डी.एल. नागेश यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT