astrologer death news | आईचा मृत्यू, १६ लाखांचे कर्ज, प्रेयसी... : ज्योतिषाने जीवन संपविल्‍यामागील धक्कादायक वास्तव समोर!

astrologer death news | गाझियाबादमध्‍ये ज्‍योतिषाने १३ व्‍या मजल्‍यावरुन उडी मारुन संपवली होती जीवनयात्रा
astrologer death news
प्रातिनिधिक छायाचित्र.file photo.
Published on
Updated on

astrologer death news

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका ४२ वर्षीय ज्योतिषाने आपल्या इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेला एक आठवडा लोटल्यानंतर, आता काही धक्कादायक तपशील समोर आले आहेत. विशेष म्हणजे, याच वेळी त्याच्या घरात एका ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत त्याच्या आईचा मृतदेहही आढळून आला होता.

मुलाने जीवन संपवले, फ्लॅटमध्ये आढळला आईचा मृतदेह

गाझियाबादमधील एका बहुमजली सोसायटीमध्ये १९ मार्च रोजी ज्‍योतिषी राजवीर यांनी १३ व्‍या मजल्‍यावरुन उडी मारुन जीवन संपवले होते.पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा त्यांना इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या त्यांच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये राजवीरच्या ७० वर्षीय आईचा मृतदेह आढळून आला. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पोलिसांनी हत्येची शक्यता फेटाळून लावली आहे; तसेच, तिचा मृत्यू होऊन किमान दोन दिवस उलटले असावेत, असेही पोलिसांनी नमूद केले आहे. आईच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या दुखापतीच्या खुणा दिसून आल्या नाहीत; तरीही, तिच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल," असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

astrologer death news
Lucknow Horror: धक्कादाक! NEET वरून वाद; मेरठ प्रकरण वाचलं... २१ वर्षाच्या मुलानं बापाचे हात - पाय तोडले, निळ्या ड्रममध्ये घातले

दोन दिवस आईच्‍या मृतदेहाबरोबरच रहिला...

राजीवर यांचा विवाह झाला होता. ते आपल्‍या आई सतनाम यांच्‍यासोबर राहत असे. तर त्‍यांची विभक्त झालेली पत्नी आणि मुलगा स्वतंत्रपणे राहत होते. राजवीरच्या विभक्त पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांपासून राजवीरने घराच्या खर्चासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केली नव्हती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन संपविण्‍यापूर्वी राजीवर हा सलग दोन दिवस आपल्या घरात आईचा मृतदेह सोबत घेऊनच राहत होता. आपल्‍या निकटवर्तीयांशी बोलताना राजीवर म्‍हणत असे की, आईचा मृत्यू झाला, तर तो देखील आपले जीवन संपवणार टाकू, असे पोलिसांनी सांगितले.

astrologer death news
Astrology Controversy |प्रेमविवाहाला 'भविष्या'चे ग्रहण..! लग्नाबाबत ज्योतिषाने केले भाकीत; इंजिनिअर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल!

जीवन संपविण्‍यापूर्वी पत्‍नीला पाठवला मोबाईल फोनचा 'लॉक कोड'

आत्महत्या करण्यासाठी इमारतीवरून उडी मारण्याच्या काही मिनिटे आधी, राजवीर यांनी आपल्या मोबाईल फोनचा 'लॉक कोड' (पासवर्ड) एका टेक्स्ट मेसेजद्वारे आपल्या विभक्त पत्नीला पाठवला होता. जेव्हा पोलिसांनी राजवीर यांचा फोन तपासला. फोनमधी माहितीवरुन आढळून आले, की त्याचे हरियाणामधील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते, अशीही माहिती समोर आली आहे.राजवीरवर सुमारे १५ ते १६ लाख रुपयांचे कर्ज होते, अशी माहितीही पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

astrologer death news
Shocking Crime News: लाँग ड्राईव्ह वेळी झाला वाद... CA ने पत्नीचा थेट कात्रीनंच गळा चिरला... पोलिसांनी १८ तासात कसा छडा लावला?

मागील काही वर्षांपासून अनेक धक्‍कादायक प्रसंगांना जावे लागले सामोरे

गेल्या काही वर्षांत राजवीरला वैयक्तिक आयुष्यात अनेक मोठ्या धक्क्यांचा सामना करावा लागला होता. काही वर्षांपूर्वीच त्याचे वडील आणि भाऊ या दोघांचेही निधन झाले होते; शिवाय, त्याच्या भावाच्या विधवा पत्नीनेही त्यानंतर दुसरे लग्न केले होते. राजवीर शेजाऱ्यांशी फारसा संवाद साधत नसे किंवा त्यांच्याशी मिसळत नसे, असे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news