Bengaluru Traffic Jam: बंगळुरूमधील जुन्या एअरपोर्ट रोड्रवर जवळपास ३० मिनिटे ट्रॅफिक ब्लॉक करण्यात आलं होतं. या मार्गाने राज्यपालांचा ताफा जाणार होता असा दावा एक्सवर करण्यात आला आहे. त्यातच अंडरपासचं बांधकाम सुरू असल्याने ट्रॅफिकची समस्या आणखीच तीव्र झाली. यामुळं शेकडो गाड्या अडकून पडल्या होत्या.
याच ट्रॅफिकमध्ये आपल्या गर्भवती पत्नीला घेऊन जाणारा एक व्यक्ती अडकला. त्याला या व्हीआयपी कल्चरचा इतका राग आला की त्याचा विरोध करण्यासाठी तो थेट रस्त्याच्या मधोमध आंदोलनासाठी बसला. त्यावेळी तिथे असलेल्या इतर वाहनधारकांनी देखील पोलिसांना सामान्य नागरिकांपेक्षा व्हीआयपींना प्राधान्य दिल्यावरून चांगलेच धारेवर धरले.
सध्या याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान पोलीसांनी देखील या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी ३० मिनिटे गाड्या थोपवून धरल्याची शक्यता नाकारली आहे.
एक्सवर प्रज्वल प्रिन्स नावाने एक ट्विट करण्यात आलं आहे. ही पोस्ट दुपारी १२.१३ मिनिटांनी करण्यात आली असून यात, 'अंडरपास कन्स्ट्रक्शनमुळे जुना एअरपोर्टवर आधीच ट्रॅफिकची समस्या असते. त्यात आज राज्यपालांचा ताफा जाणार म्हणून तब्बल अर्धा तास ट्रॅफिक ब्लॉक करून ठेवण्यात आलं. एक व्यक्ती आपल्या गर्भवती पत्नीला घेऊन चालला होता. तो यात अडकला. व्हीआयपींची सोय महत्वाची की नागरिकांची?'
या पोस्टमधील व्हिडिओत एक पुरूष इस्त्रो जंक्शनजवळ झेब्रा क्रॉसिंगजवळ बसलेला दिसत आहे. तो पोलिसांशी हुज्जत घालत आहे. तो सांगत आहे की त्याची पत्नी गर्भवती आहे आणि त्याची गाडी सिग्नलला थांपवण्यात आली आहे. हा सगळा प्रकार राज्यपालांनी विमानतळ अजून सोडलेलं नाही तेव्हा घडला आहे.
ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर, ट्रॅफिक पोलिसांनी होयसाला पोलीसांना याबाबत माहिती दिल्यानंतर तो पुरूष उठला आणि त्याने राज्यपालांच्या ताफ्यासाठी वाट करून दिली.
या व्हिडिओत तो पुरूष आपल्या गर्भवती पत्नीला कुठं घेऊन जात होता याचा कोणता उल्लेख नाहीये. मात्र नेटकऱ्यांनी आणि काही पुष्टी न होऊ शकलेल्या रिपोर्टनुसार तो व्यक्ती आपल्या पत्नीला रूग्णालयात घेऊन जात होता. विशेष म्हणजे तो जिथं आपल्या पत्नीला घेऊन जात होता त्यासाठी पर्यायी मार्ग नव्हता.
मात्र या घटनेनंतर व्हीआयपी कल्चरमुळे सामान्य नागरिकांना त्याचा होणारा त्रास हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षेचे कारण देऊन होणारी ही व्हीआयपी मुव्हमेंट सार्वजनिक कल्याणाचा बळी देऊन विशेष करून ज्यावेळी एखादी गर्भवती महिलेबाबत इमर्जन्सी परिस्थिती असताना करणे योग्य आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.
रहिवासी आणि वाहनधारकांनी आधीच कन्स्ट्रक्शनमुळं या रस्त्यावरून जाताना त्रास होत आहे. त्यात पर्यायी रस्त्याची सोय न करता व्हीआयपीच्या ताफ्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक करणं योग्य आहे का अशी विचारणा लोकं करत आहेत. याबाबत प्रसिद्ध व्यक्तींनी देखील सोशल मीडियाद्वारे आपला राग व्यक्त केला आहे.