राष्ट्रीय

“पंजाब में घूम रहा है एक नकली केजरीवाल, बचकर रहना”

अमृता चौगुले

मोगा: पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोगा येथे मेगा रॅली घेतली. रॅलीत मोठी घोषणा करताना म्हणाले की, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास प्रत्येक महिलेला एक हजार रुपये दिले जातील. जर कुटुंबात मुलगी, सून, सासू असेल तर प्रत्येकाच्या खात्यात 1-1 हजार रुपये पाठवले जातील. केजरीवाल यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला.

केजरीवाल म्हणाले, 'मला एक नकली केजरीवाल पंजाबमध्ये फिरताना दिसत आहे. मी जे काही शब्द देऊन जातो, दोन दिवसांनी तेही तोच शब्द देतात पण काम करत नाहीत. ते म्हणाले, वीजबिल माफ केल्याची घोषणा झाली पण वीजबिल कोणाचेही माफ झाले नाही. आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आले तर भविष्य घडेल. वीज बिल माफ कसे करायचे हे कोणालाच माहीत नाही, फक्त केजरीवालच ते करू शकतात. त्यामुळे खोट्या केजरीवालांपासून दूर राहा. पंजाब आरोग्य सेवेवर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले, एक मोहल्ला क्लिनिक बनवण्यासाठी 20 लाख रुपये लागतात आणि त्यासाठी फक्त 10 दिवस लागतात, मग बनावट केजरीवालांनी ते का बनवले नाही, हे काम फक्त खरे केजरीवालच करू शकतात.

याशिवाय अरविंद केजरीवाल यांनी मुलींच्या शिक्षणाबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, अनेक मुली कॉलेजला जाऊ शकत नाहीत, पण आता त्यांना जाता येणार आहे, मुलींना आता नवीन सूट खरेदी करता येणार आहे. मोगा येथे केजरीवाल यांनी मोदी सरकारवरही हल्लाबोल केला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT