Arvind Kejriwal Death Threat: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे. याबाबत पोलीस तपास करत असून धमकीचा फोन करणाऱ्याने अरविंद केजरीवाल यांच्याकडून ७ कोटी रूपयांची मागणी केली आहे.
या धमकीबाबतची तक्रार तिलक नगर आमदार जरनैल सिंग यांनी दिली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांना सांगितलं की त्यांना एक फोन कॉल आला तसेच व्हॉट्स अॅप मेसेज देखील आला असून संबंधित व्यक्तीने तो बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा केला आहे.
ही तक्रार पंजाबमधील मोहाली येथील पोलीस ठाण्यात ६ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आली आहे. त्यात फोन करणाऱ्या व्यक्तीने ७ कोटी रूपयांची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाही तर केजरीवाल, त्यांची मुलगी हर्षिता केजरीवाल यांना ठार मारणार अशी धमकी दिली आहे.
मोहाली पोलिसांनी याबाबत भारतीय न्याय संहिता आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखाल केला आहे. ही केस सायबर सेल क्राईम युनिटच्या सुनिल कुमार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते कॉल रेकॉर्ड तपासत आहेत. तसेच संबंधित मोबाईल नंबरचा इंटरनेट प्रोटोकॉल लॉग आणि लोकेशन डेटा देखील तपासला जात आहे. अरविंद केजरीवाल यांना पुरेशी सुरक्षा देखील देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्ते आहे. आम तितं काही महिन्यात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे.
आता माजी मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्यामुळे लॉरेन्स बिश्वोई गँग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लॉरेन्स गँगने यापूर्वी देखील खंडणी, गोळीबार आणि टार्गेटेड किलिंगमध्ये लॉरेन्स बिश्नाई गँगचे नाव समोर आले आहे.