apple iphone fold release date rumors expected price
पुढारी ऑनालाईन :
सॅमसंग, व्हिवो, शाओमी यांसारख्या ब्रँड्सनी आधीच फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. आता लेटेस्ट रिपोर्टनुसार Apple चा Fold Phone देखील लवकरच बाजारात दाखल होणार आहे. या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, अमेरिकन कंपनी Apple आपल्या फोल्ड फोनमध्ये कोरियन कंपनी सॅमसंगने विकसित केलेली अत्याधुनिक डिस्प्ले टेक्नोलॉजी वापरणार आहे. ही टेक्नोलॉजी सध्याच्या OLED पॅनलपेक्षा अधिक चांगली आणि कार्यक्षम असणार आहे.
Apple च्या फोल्डेबल स्मार्टफोनबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता यासंदर्भात डिस्प्ले टेक्नोलॉजीबाबत नवा खुलासा समोर आला आहे. Apple च्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये सॅमसंगने तयार केलेला CoE (Color Filter on Encapsulation) OLED पॅनल वापरण्यात येणार आहे. ही माहिती The Elec या वेबसाईटने दिली आहे.
COE बेस्ड OLED पॅनलचे फायदे
COE आधारित OLED पॅनलमुळे जुन्या पॅनलच्या तुलनेत अधिक ब्राइटनेस मिळणार आहे. पारंपरिक OLED पॅनलमध्ये डिस्प्लेच्या वर एक पोलरायझिंग फिल्म असते, जी रिफ्लेक्शन कमी करण्याचे काम करते.
सध्याच्या OLED पॅनलची मर्यादा
सध्याच्या OLED टेक्नोलॉजीतील पॅनलची अडचण म्हणजे, हे पॅनल काही प्रमाणात प्रकाश स्वतःच शोषून घेतात. त्यामुळे डिस्प्लेची ब्राइटनेस आणि कार्यक्षमता (Efficiency) दोन्हीवर परिणाम होतो.
COE बेस्ड टेक्नोलॉजीची खासियत
मीडिया रिपोर्टनुसार, Apple आपल्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये COE बेस्ड OLED पॅनलचा वापर करणार आहे. हा स्मार्टफोन 2026 च्या अखेरीस अनवील केला जाऊ शकतो. मात्र, कंपनीकडून याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. तसेच किंमतीबाबतही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Apple Air 2 मध्येही नवी टेक्नोलॉजी रिपोर्ट्सनुसार, COE बेस्ड OLED पॅनलचा वापर Apple Air 2 मध्येही केला जाऊ शकतो. मात्र, याबाबतही कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. Apple Air हा कंपनीचा सर्वात स्लिम स्मार्टफोन असून त्याची जाडी फक्त 5.6 मिमी आहे. सध्याच्या व्हर्जनमध्ये सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
फोल्ड फोनच्या शर्यतीत इतर ब्रँड्स आघाडीवर
भारतासह जागतिक बाजारात सॅमसंग आणि व्हिवो यांचे फोल्डेबल स्मार्टफोन आधीपासूनच विक्रीस उपलब्ध आहेत. तर शाओमीने चीनमध्ये आपला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सॅमसंगने आतापर्यंत अनेक फोल्ड स्मार्टफोनचे व्हर्जन्स लॉन्च केले आहेत. मात्र Apple ने अद्याप एकही फोल्डेबल स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च केलेला नाही. तरीदेखील, यासंदर्भात अनेक लीक्स समोर आले आहेत, पण कंपनीकडून अजून कोणतेही अधिकृत घोषणापत्र आलेले नाही.