

bollywood photo dhurandhar 20 years old sara arjun sizzling look backless deep neckline dress
पुढारी ऑनलाईन :
२० वर्षांची सारा अर्जुन सध्या ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून, तिचा डेब्यू चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
चित्रपटात साराने रणवीर सिंगच्या पत्नी अलीना ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपटाच्या यशाच्या दरम्यान आता तिने आपला सुपर किलर लुक शेअर केला आहे.
सारा अर्जुनने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर लेटेस्ट फोटोशूटमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले असून, ते पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
‘धुरंधर’च्या यशानंतर सारा अर्जुनचा सुपर किलर लुक, मरून बॅकलेस ड्रेसमध्ये दिले बोल्ड पोज. २० वर्षांची सारा अर्जुन ठरतेय स्टाइल आयकॉन, मरून बॅकलेस ड्रेसमधील लुकने जिंकली चाहत्यांची मनं
साराने मरून रंगाची डीप प्लंजिंग नेकलाइन असलेला बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये तिने बसून आणि उभं राहून असे अनेक किलर पोज दिले आहेत.
मरून बॅकलेस ड्रेससोबत साराने केसांमध्ये मेसी हेअर बन केला आहे. कॅटी आयलुक मेकअप आणि ब्राउन न्यूड लिपस्टिकमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा लुक पाहताच कोणीही थक्क होईल.
साराचा हा इलेक्ट्रिफाइंग लुक पाहून ती केवळ २० वर्षांची आहे, यावर विश्वास बसणार नाही. तिच्या सिजलिंग अंदाजाने तीने सर्वांवर आपल्या सौंदर्याची मोहिनी घातलीय असेच म्हणावे लागेल.
कमेंट सेक्शनमध्ये चाहते तिची भरभरून स्तुती करत आहेत. चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. साराच्या किलर लुकने प्रत्येकाचं मन जिंकलं आहे.
एका युजरने लिहिलं आहे “माय रोज गर्ल”. तर कुणी “तहलका मचा दिया” असं म्हटलं आहे. काही जण साराला “फायर” म्हणत आहेत, तर काही हार्ट इमोजीद्वारे तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.