Anant Ambani save cocaine hippos pudhari
राष्ट्रीय

Anant Ambani save cocaine hippos: पाब्लो एस्कोबारच्या 'कोकेन हिप्पों'साठी अनंत अंबानी सरसावले; 'कायमचं घर' देण्याची ऑफर

Anirudha Sankpal

Anant Ambani save cocaine hippos: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपूत्र आणि प्राणी प्रेमी अनंत अंबानी यांनी कोलंबिया सरकारकडे ८० कोकेन हिप्पो वाचवण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. अनंत अंबानी यांनी कोलंबिया सरकारला पाब्लो एस्कोबारने पाळलेल्या ८० हिप्पोंना मारण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती केली आहे. अनंत अंबानी यांनी या हिप्पोंचे वनतारामध्ये पुर्नवसन करण्याची ऑफर देखील दिली आहे.

वनतारा हे वाईल्ड लाईफ रेस्क्यू, उपचार आणि पुर्नवसन केंद्र आहे. हे केंद्र गुजरातमधील जामनगरमधील ३५०० एकर परिसरात वसवण्यात आलेलं आहे. याची निर्मिती रिलायन्स फाऊंडेशनने केली असून हा अनंत अंबानी यांचा महत्वकांशी प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जातं.

काय आहे अनंत अंबानींचे स्टेटमेंट

अनंत अंबानी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतात, 'या ८० पानघोड्यांनी (हिप्पो) कुठं जन्म घ्यायचा याची निवड केली नव्हती. त्यांनी सध्याची त्यांची परिस्थिती देखील स्वतःहून निर्माण केली नव्हती. ते जगत आहेत ते संवेदनशील आहेत आणि जर आपल्याकडे त्यांना वाचवण्याची सुरक्षित आणि मानवी क्षमता असेल तर आपली जबाबदारी आहे की आपण त्याबाबत प्रयत्न केले पाहिजेत.'

अनंत अंबानी यांची हे कोकेन हिप्पो वनताराला रिलोकेट करण्याची योजना आहे. त्यांनी या ८० जनावरांसाठी त्यांच्या कायमच्या घरात सुरक्षित, शास्त्रीय ट्रान्सलोकेशन करण्याची विनंती केली आहे. अंबानी यांनी याबाबतचा सविस्तर योजना आधीच सादर केली होती.

आम्ही विशेष सोय करू

याबाबत अनंत अंबानींच्या वतीने वनताराचे सीईओ विवान करानी यांनी कोलंबिया सरकारला पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी या हिप्पोजसाठी विशेष डिझाईन केलेले त्यांच्या सध्याच्या नैसर्गिक हॅबिटॅटमधील सर्व गोष्टींचा समावेश असलेले वातावरण तयार करून त्यांची काळजी घेण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं.

वनतारा प्रशासनाने प्रत्येक जीव महत्वाचा या भारतीय तत्वानुसार आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव सहअस्तित्व, काळजी आणि सर्व सजीवांचा आदर याचे प्रतिबिंब आहे.

काय आहेत कोकोन हिप्पोज?

कोकोने हिप्पोज असं त्यांना आता बोललं जातं. अंमली पदार्थ लॉर्ड पाब्लो एस्कोबार यांनी १९८० मध्ये कोलंबोमध्ये जे हिप्पोज आणले होते त्यांचे हे वंशज आहेत. एस्कोबारला लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठे खासगी प्राणी संग्रहालय तयार करायचे होते. मात्र त्याला १९९३ मध्ये एन्काऊन्टरमध्ये मारण्यात आलं होतं.

त्यानंतर एस्कोबारच्या या खासगी प्राणी संग्रहालयाकडे कोणी पाहिले नाही. त्यानंतर इथल्या प्राण्यांनी आजूबाजूच्या भागात आपला वावर वाढवला. त्यांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त वाढली. सध्याच्या घडीला कोलंबियाच्या या भागात २०० हिप्पो असल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिक वनस्पतींना धोका

हिप्पो हा प्राणी मुळचा कोलंबियाचा नाही. कोलंबियाच्या सरकारच्या म्हणण्यानुसार काही प्राणी हे मगदालेना नदीच्या आसपासचा भाग नष्ट करत आहेत. ते मासेमारांवर देखील हल्ले करत आहेत. त्यांचा वावर हा या भागातील स्थानिक वनस्पती आणि जनावरांना धोका पोहचवत आहे.

या कारणांमुळेच कोलंबिया सरकारने ८० पेक्षा जास्त हिप्पोजना मारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनंत अंबानी या ८० हिप्पोजचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT