Anant Ambani Net Worth: मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानींची संपत्ती किती? किती झालयं शिक्षण?

Anant Ambani Net Worth: अनंत अंबानी हे मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र असून ते देशातील श्रीमंत युवा उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांची संपत्ती सुमारे 3 ते 3.5 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.
Anant Ambani Net Worth
Anant Ambani Net WorthPudhari
Published on
Updated on

Anant Ambani Net Worth: भारताचे आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी सध्या देशातील सर्वात चर्चेत असलेल्या युवा उद्योगपतींपैकी एक आहेत. आज, 10 एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस असून, त्यांची संपत्ती किती आहे याबाबत चर्चा सुरु आहे.

अनंत अंबानी हे रिलायन्स समूहाशी जोडलेले असून, त्यांच्या कुटुंबाची परंपरा आणि नेतृत्व यांचा वारसा त्यांना मिळाला आहे. त्यांनी अमेरिकेतील Brown University मधून शिक्षण घेतले असून, व्यवसाय व्यवस्थापनातील ज्ञानामुळे ते कंपनीतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

Anant Ambani Net Worth
EPFO 3.0 Update: फटाफट क्लेम, ट्रान्सफर आणि विड्रॉल... EPFO ​​3.0 मध्ये कोणते बदल होणार?

संपत्तीबाबत बोलायचं झालं, तर अनंत अंबानी यांची अंदाजे एकूण संपत्ती सुमारे 3 लाख कोटी ते 3.59 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे मानले जाते. म्हणजेच जवळपास 40 अब्ज डॉलर इतकी ही रक्कम असून, ते जगातील सर्वात श्रीमंत तरुण उद्योजकांपैकी एक मानले जातात.

रिलायन्स समूहात त्यांची भूमिका देखील खूप महत्त्वाची आहे. ते Reliance Industries च्या विविध कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. यामध्ये रिलायन्स रिटेल, जिओ प्लॅटफॉर्म्स तसेच नवीन ऊर्जा आणि सोलर व्यवसायाशी संबंधित कंपन्यांचा समावेश आहे. विशेषतः ग्रीन एनर्जी आणि रिन्यूएबल सेक्टरमध्ये ते मोठ्या प्रमाणात काम करत आहेत.

Anant Ambani Net Worth
Gold Price Today: चांदी 1,100 रुपयांनी तर सोन्याचे भाव 800 रुपयांनी घसरले; सोन्याचे भाव का घसरत आहेत?

अनंत अंबानी यांची आवड केवळ व्यवसायापुरती मर्यादित नाही. त्यांना प्राण्यांविषयी विशेष प्रेम असून, त्यांनी ‘वनतारा’ या मोठ्या वन्यजीव पुनर्वसन प्रकल्पातही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. हा प्रकल्प सुमारे 3500 एकर क्षेत्रात उभारण्यात आला आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी 2024 मध्ये राधिका मर्चंट यांच्याशी विवाह केला. अवघ्या 30 व्या वर्षी त्यांनी व्यवसाय, सामाजिक कार्य आणि कुटुंबाचा वारसा या तिन्ही क्षेत्रांमध्ये ठसा उमटवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news