पुढारी ऑनलाईन :
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तर काश्मीरच्या या जिल्ह्यात दुपारी १२.२६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी होती. तर या भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे. सध्या तरी यामुळे कुठलेही नुकसान झाल्याची माहिती मिळालेली नाही.
आज पहाटे 2:02 वाजता लेह, लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. लेहमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी होती. येथेही सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.