राष्ट्रीय

संस्कृती मंत्रालयाकडे हस्तांतरित होणार एअर इंडियाचा कलासंग्रह !

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारने एअर इंडियाची विक्री टाटा समुहाला केल्यानंतर कंपनीचे मौल्यवान कलासंग्रह यांचा अमूल्य ठेवा केंद्रीय संस्कृती मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दोन हजारांहून अधिक कलाकृतींचा समावेश असलेला कंपनीचा कलासंग्रह राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात (एनजीएमए) प्रदर्शित केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंबंधी अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसला, तरी लवकरच संस्कृती मंत्रालयाकडून अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या मौल्यवान कलाकृती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकतीच यासंबंधी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. आता अंतिम हस्तांतरणासंबंधी फाईल संस्कृत मंत्रालयाकडून घेण्यात येणार आहे.

लवकरच एअर इंडियाच्या कलाकृती एनजीएमएमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी मिळेल, असा विश्वास महासंचालक अद्वैत गणनायक यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. एअर इंडियाच्या कलासंग्रहात एमएफ हुसैन, अंजली इला मेनन, जतिन दास, एसएच रजा, व्हीएस गायतोंडे तसेच केए आरासह प्रसिद्ध कलाकारांच्या कलाकृतीचा समावेश आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्हिडिओ : अमेरिकेत मराठी झेंडा रोवणाऱ्या गौरी कुलकर्णी यांच्याशी खास बातचीत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT