

वाशिम : पुढारी वृत्तसेवा
वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांची 100 कोटीच्या भ्रष्ट्राचार प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात भावना गवळी यांचे निकटवर्तीय असलेल्या सईद खान यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांनी कबुली जबाबातून आदिवासी विभागाचा 231 कोटींचा खाऊ घोटाळा झाला असल्याची माहिती त्यांच्याकडून समोर आली आहे. सदर प्रकरणात एकूण पाच जण असून, हिंगोली येथील एकाला ईडीकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक हरीश सारडा यांनी वाशिम येथे आज पत्रकारांना बोलताना दिली आहे.