Viral Video girlfriend wife clash file photo
राष्ट्रीय

Viral Video: हॉटेलमध्ये पतीसोबत दिसली प्रेयसी; पत्नी भडकली, भररस्त्यात तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

विवाहित तरुण, त्याची पत्नी आणि कथित प्रेयसी यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Viral Video girlfriend wife clash

आग्रा: विवाहित तरुण, त्याची पत्नी आणि कथित प्रेयसी यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हॉटेलमध्ये पती प्रेयसीसोबत असल्याची माहिती मिळताच पत्नी तेथे पोहोचली. त्यानंतर सुरू झालेला वाद थेट रस्त्यावर पोहोचला आणि दोन्ही महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हा व्हिडिओ आहे. ताजगंज परिसरातील एका हॉटेलमध्ये विवाहित युवक आपल्या कथित प्रेयसीसोबत गेला होता. याची माहिती मिळाल्यानंतर त्याची पत्नीही हॉटेलमध्ये दाखल झाली. तेथे पतीला कथित प्रेयसीसोबत पाहताच पत्नीचा संताप अनावर झाला. हॉटेलमध्येच पत्नी आणि प्रेयसी यांच्यात सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद चिघळला आणि दोघींमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच संबंधित युवकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि प्रेयसीला हॉटेलबाहेर पाठवले.

हॉटेलमधून बाहेर पडताच प्रेयसी स्कूटीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, पत्नी तिच्या मागे धावत गेली. पत्नीने स्कूटी थांबवून तिला खाली ओढले आणि चपलांनी मारहाण केली. त्यानंतर दोघींमध्ये रस्त्यावरच जोरदार झटापट सुरू झाली.

केस ओढून एकमेकींवर तुटून पडल्या

हाणामारीदरम्यान प्रेयसीने पत्नीचे केस पकडून तिला रस्त्यावर पाडले. तिला काही अंतरापर्यंत ओढल्याचाही दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे, पत्नीनेही प्रत्युत्तर देताना पतीला चपलांनी मारहाण केली तसेच प्रेयसीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या गोंधळात पत्नीचे कपडेही फाटल्याची माहिती समोर आली आहे.

व्हिडीओ व्हायरल

रस्त्यावर सुरू असलेल्या या गोंधळामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून दोन्ही महिलांना वेगळे केले. त्यानंतर कथित प्रेयसी स्कूटीवरून तेथून निघून गेली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, ताजगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक जसवीर सिरोही यांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT