Agniveer Permanent Job: लष्करात सहा वर्षे सेवा दिल्यानंतर देखील अग्नीवीरांची नोकरी पक्की होणे सोपे असणार नाही. ४ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ज्या ७५ टक्के अग्नीवीरांना दोन वर्षाचा सेवा विस्तार देण्यात येणार आहे. त्यांना ६ वर्षानंतर देखील ते लष्करात कायम होतील अशी गॅरंटी नाहीय. त्यांना रेग्युलर सैनिक होण्यासाठी कडक चाचणीतून जावे लागणार आहे.
या कडक चाचण्यांमध्ये फिजिकल फिटनेस, फायरिंग स्कील, मेडिकल फिटनेस आणि शिस्त या प्रमुख कसोट्या पार कराव्या लागणार आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने अग्नीपथ योजनेत बदल करत ४ वर्षानंतर सेवामुक्त होणाऱ्या ७५ टक्के अग्नीवीरांना सेवेत दोन वर्षाचे एक्स्टेंशन देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा देशात सध्याच्या घडीला सेवा देत असलेल्या ३.१८ लाख अग्नीवीरांसाठी करण्यात आली होती.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अग्नीवीर सहा वर्षानंतर देखील भारतीय लष्करात सेवा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी देखील निवड प्रक्रिया कठीण असणार आहे. सशस्त्र दलात डिफेन्समध्ये नवीन तंत्रज्ञान आणि शस्त्रे सामील केली जात आहेत. ते पाहून अशाच अग्नीवीरांना प्राधान्य देण्यात येणार आहे जे मल्टी स्कील्ड आहेत. तसेच ते तंत्रज्ञान आणि शस्त्रे चालवण्यात माहीर आहेत का याची देखील पडताळणी केली जाईल.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्नीवीर सहा वर्षाच्या कार्यकाळानंतर कायम नोकरीसाठी लो मेडिकल कॅटेगरी, शिस्तभंग करणाऱ्या उमेदवारांना न निवडणं हा एक क्रायटेरिया असणार आहे.
तसेच एका अधिकाऱ्याने सांगितलं की कायम नोकरीसाठी निवड करताना अग्नीवीरांच्या दोन काम करण्याच्या पद्धतीवर बारीक नजर असणार आहे. गेल्या काही वर्षात कायम सैनिकांमध्ये लो मेडिकल कॅटेगिरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या वैद्यकीय समस्या या जीवनशैलीशी निगडीत आहेत.
त्यामुळं अग्नीवीरांना जर कायम नोकरी हवी असेल तर त्यांना फिजिकल टेस्टमध्ये एक्सलंट ग्रेड मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे फायरिंगचे स्कील देखील फर्स्ट क्साल शॉर्ट स्तारवर असलं पाहिजे. फायरिंगचे स्तर हे मार्क्समॅन, फर्स्ट शॉट आणि स्टँडर्ड शॉट या श्रेणीत विभागले आहेत.