Agniveer CEE Results Update: भारतीय लष्काराने अग्निवीर CEE २०२६ चा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. त्यांच्या निकालाची यादी अग्निवीर आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस (ARO) मेरिट लिस्ट अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in वर पाहू शकतात. देशातील अनेक अग्निवीर आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसचे निकाल जाहीर करण्यात आला आहे.
पात्र उमेदवारांनी ते पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय झाले आहेत का हे या यादीत चेक करू शकतात. ही मेरिट लिस्ट पीडीएफ फॉरमॅटमध्ये देण्यात आली आहे. यामध्ये ज्या उमेदावारींनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्या उमेदवारांचे नाव किंवा रोल नंबर जाहीर करण्यात आले आहेत.
पात्र उमेदवार हे आका पुढच्या प्रक्रियेस पात्र असणार आहेत. जे उमेदवार पात्र झाले आहेत त्यांना आता फिजिकल फिटनेस टेस्ट आणि फिजकल मेजरमेंट टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या टप्प्यांना सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येक उमेदवाराला अग्निवीर म्हणून निवड होण्यासाठी या प्रत्येक टप्प्यात पात्र व्हावं लागणार आहे.
दरम्यान, प्रवेश परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहेत. ते या वेबसाईटवर होम पेजवर देण्यात आलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करून त्यांना आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस (ARO) सिलेक्ट करायचं आहे किंवा रिक्रुटमेंट रिजन निवडून तुम्ही मेरिट लिस्ट पाहू शकता. पीडीएफ ओपन झाल्यावर उमेदवार रोल नंबर किंवा नावाने त्यांचा पात्रतेचा स्टेटस पाहू शकतात.
निकाल पाहिल्यानंतर उमेदवार काळजीपूर्वक मेरिट लिस्ट डिटेल्स व्हेरिफाय करू शकतात. जर एखादी अनियमितता आढळून आली तर त्यांनी त्वरित आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसला संपर्क करायचा आहे. त्याचबरोबर पुढच्या अपडेटसाठी उमेदवारांनी इंडियन आर्मी पोर्टल नियमीत चेक करायचं आहे. तिथं फिजीकल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल एक्झामिनेशनचं शेड्युल पडणार आहे.