Agniveer News : २३५० अग्निवीर प्रशिक्षणासाठी रवाना

मराठवाड्यातून लष्करात २ हजार ३५० अग्निवीरांची भरती झाली आहे.
Agniveer News : २३५० अग्निवीर प्रशिक्षणासाठी रवाना
Published on
Updated on

2,350 Agniveers from Marathwada have been recruited into the Army

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातून लष्करात २ हजार ३५० अग्निवीरांची भरती झाली आहे. या सर्वांना प्रशिक्षणासाठी १९ जून ते ३ जुलै या दरम्यान सैन्य प्रशिक्षण केंद्रांकडे रवाना करण्यात आले आहे.

Agniveer News : २३५० अग्निवीर प्रशिक्षणासाठी रवाना
Chhatrapati Sambhajinagar ZP : जि.प. आरोग्य विभागाचा उडाला बोजवारा !

आर्मी रिक्रूटिंग कार्यालयाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भरती मेळावा आयोजित केला होता. यातून या उमेदवारांची निवड करण्यात आली. ही मोहीम 'अनिबाज आर्टिलरी ब्रिगेड', विभागीय आयुक्त श्री. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी, पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि भरती मेळाव्याच्या आयोजनाशी संबंधित सर्व शासकीय विभागांच्या सहकार्यातून पूर्ण करण्यात आली.

ही भरती प्रक्रिया दररोज सकाळी ६ वाजता सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दिवसभर चाललेल्या या प्रक्रियेत उमेदवारांच्या सर्व आवश्यक गरजांची आणि सुविधांची काळजी घेण्यात आली होती.

Agniveer News : २३५० अग्निवीर प्रशिक्षणासाठी रवाना
Parbhani News : बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलीच ठरल्या सरस

बायोमेट्रिक पडताळणी, प्रमाणीकरण, कागदपत्रांची छाननी, सामान्य वैद्यकीय तपासणी, बॅचिंग आणि अंतिम रवानगी यांसारख्या प्रक्रिया नियोजित पद्धतीने पार पडल्या, ज्यामुळे प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता, कार्यक्षमता आणि अचूकता सुनिश्चित झाली.

हे तरुण अग्निवीर लष्करी प्रशिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करत असताना ते राष्ट्राच्या आशा-आकांक्षा आपल्यासोबत घेऊन जात आहेत. त्यांच्या या प्रवासामुळे मराठवाड्यातील अनेक तरुणांना भविष्यात भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून सामील होण्याची प्रेरणा मिळेल, असे आर्मी रिक्रूटिंग कार्यालय, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news