दिल्लीनंतर आता केरळमध्येही आढळला रुग्ण File Photo
राष्ट्रीय

Monkeypox : सावधान! मंकीपॉक्सचा धोका वाढतोय; दिल्लीनंतर आता केरळमध्येही आढळला रुग्ण

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशामध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत. याबद्दल बुधवारी (दि.18) आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यापूर्वी दिल्लीत एक प्रकरण समोर आले होते, आता केरळमध्ये देखील एका तरुणाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. याबाबत केरलच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, केरळमधील मलप्पुरममधील एका 38 वर्षीय व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लागण झाली आहे.

दुबईहून परतलेल्या एका तरुणाला मंकीपॉक्सच्या लक्षणांमुळे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मांजेरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात दुबईहून परत आलेल्या व्यक्तीमध्ये मंकी पॉक्सची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीनंतर केरळमधील हे प्रकरण भारतातील या आजाराचे दुसरे प्रकरण असेल.

मलाप्पुरमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले

नुकतेच दुबईहून परत आलेल्या रुग्णाला या आजाराची लक्षणे दिसून आली. त्याला मलप्पुरमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यामध्ये मंकीपॉक्स संसर्गाची पुष्टी झाली. मंगळवारी (दि.17) केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, रुग्णाला घरीच वेगळे ठेवण्यात आले होते आणि खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

दिल्लीमध्ये आढळला पहिला रुग्ण

मागील आठवड्यात राजधानीत मंकीपॉक्सचे एक प्रकरण नोंदवले गेले होते. जिथे हिसार, हरियाणातील एका 26 वर्षीय पुरुषाची विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह आली. यानंतर त्याला दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT