Monkey pox : सिरमकडून मंकीपॉक्सवरील लसीचे काम सुरू

मंकीपॉक्सवरील लस पुढील एक वर्षामध्ये विकसित होण्याची अपेक्षा
MPOX Vaccine
Monkey Poxfile photo
Published on
Updated on

राज्य सरकारने इतर देशांतील मंकीपॉक्सचा उद्रेक लक्षात घेत मार्गदर्शकतत्त्वे जाहीर केली आहेत. दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी सध्या मंकीपॉक्सवरील लस विकसित करण्याचे काम सुरू असल्याची घोषणा केली. मंकीपॉक्सवरील लस पुढील एक वर्षामध्ये विकसित होण्याची अपेक्षा आहे.

सध्या जगभरात मंकीपॉक्सची तीव्रता आणि धोका कमी करण्यासाठी काही लसी उपलब्ध आहेत. त्या संसर्गाचा धोका आणि तीव्रता कमी करतात. मंकीपॉक्सला साथीचा आजार म्हणून अमेरिका, युरोप, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांमध्ये घोषित केले आहे. नुकतेच पाकिस्तानमध्येही मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

मंकीपॉक्सच्या उद्रेकामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सध्या या आजारासाठी लस विकसित करण्यावर काम करत आहे, त्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचू शकतो. एक वर्षाच्या कालावधीत लसीबाबत सकारात्मक बातमी कळू शकेल.

- आदर पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news